शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; भंडारा जिल्ह्यात २९७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:37 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे३२५ सार्वजनिक गणेश मंडळगणपतीला घरी नेण्यासाठी लगबग सुरु

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. तर जिल्ह्यात ३२५ तर भंडारा शहरात ५१ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळ गणपतीची स्थापना करतील. गणेशोत्सवात एसआरपीसह स्थानिक पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.भंडारा शहरासह जिल्ह्यातील जनता गणरायाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी आतूर झाली आहेत. शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, सहकार नगर, खात रोड मार्ग, शास्त्री वॉर्ड, मोठा बाजार परिसर यासह विविध ठिकाणी गणरायाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. बुधवारीच अनेकांनी गणरायाच्या मूर्तींना आपल्या घरी नेले आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा जिल्ह्यातील २९७ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गत काही वर्षांपासून या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात सुमारे ३२५ सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाणार आहे. तर घरगुती गणपतींची संख्या २८९० असल्याचे सांगण्यात आले. भंडारा शहरात भंडाराचा राजा, सन्मित्र गणेश मंडळाचा भंडाराचा राजा, बजरंग गणेश मंडळासह शहरात ५१ पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशाची स्थापना होणार.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८