शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; पवनीचा नवसाला पावणारा प्राचीन पंचमुखी गणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:34 IST

विदर्भातील अष्टविनायकात महत्वपूर्ण असलेला पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. सातशे वर्ष प्राचीन या गणेशाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते.

ठळक मुद्देविदर्भातील अष्टविनायक आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ, विविध कार्यक्रम

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील अष्टविनायकात महत्वपूर्ण असलेला पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. सातशे वर्ष प्राचीन या गणेशाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते.विदर्भाची काशी म्हणून पवनीची ओळख आहे. या पवनीत शेकडो मंदिर आहेत. त्यातील विठ्ठल गुजरी वॉर्डातील गणेश मंदिर विदर्भातील अष्टविनायकापैकी एक होय. सातशे वर्ष प्राचीन या मंदिरातील गणेशाची पंचमुखी मूर्ती शमी वृक्षावर कोरलेली आहे. पवनी शहराचे इतिहास अभ्यासक प्राध्यापक नामदेव हटवार यांच्यामते मूर्तीची स्थापना अकराव्या शतकातील असून ही मूर्ती शिळेवर कोरली आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला श्रीगणेशाच्या मूर्ती कोरल्या आहेत. पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला आहे. मूर्तीची उंची ३२ असून पूर्व पश्चिम लांबी १७ इंच आणि उत्तर दक्षिण रुंदी १५ इंच आहे. मूर्तीच्या हातात लाडू व परशू स्पष्ट दिसते. डोक्यावर मुकुट धारण केलेले आहे. नैऋत्य व पश्चिम दिशेच्या मूर्ती सरळ उभ्या असून सोंड सरळ आहे. मूर्तीच्या वरचा भाग ११ इंच निमूळता आणि मूर्ती जमिनीत दीड फूट खोल आहे.शेंदूर लावला असल्याने मूर्तीचे मुळ स्वरुप निट दिसत नाही. तरीपण मूर्ती अतिशय आकर्षक आहे. उत्तरामुखी गणेशाचे मंदिर असून समोरील भव्य खांब आहे. अनेक पर्यटक येथे नवसाला पावणाऱ्या गणेशाच्या दर्शनासाठी येतात. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणेशाची पूजा अर्चा अरविंद भट यांच्या मार्गदर्शनात केली जाते. पूर्वी मंदिर कौलारू होते. या मंदिराचा जीर्णोद्धार अरविंद भट यांनी स्वखर्चाने केला आहे. भट घराण्याचे हे कुलदैवत आहे. जागृत देवस्थान असल्याने गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते.विठ्ठल गुजरी वॉर्डातील या गणेश मंदिरात वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून येते. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या काळात तर पाय ठेवायला जागा नसते. विदर्भासह परप्रांतातील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. पंचमुखी गणेश मूर्तीची पूजा अर्चना करून देवाला साकडे घालतात. हा गणेश नवसाला पावणारा म्हणून ओळखला जात असल्याने अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात तर ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ती मंडळी नवस फेडण्यासाठी पवनी येथे येतात. गणेशोत्सवात यात्रेचे स्वरुप असते.

असे जाता येते पवनीलावैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर पवनी शहर वसले आहे. हे शहर भंडारा शहरापासून ४५ किलोमीटर आणि नागपुरवरून ८४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी राज्य मार्ग असून खासगी वाहनानेही येथे पोहचता येते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८