शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० च्या नोटावर दोन्ही बाजूंनी गांधीजींची प्रतिमा

By admin | Updated: February 10, 2017 00:29 IST

नोटाबंदीनंतर कधी चिल्लरचा तुटवडा तर कधी मोठ्या नोटांचा तुटवडा अशा घटना ऐकिवात होत्या.

भंडाऱ्यातील प्रकार : एटीएममधून निघाली नोट भंडारा : नोटाबंदीनंतर कधी चिल्लरचा तुटवडा तर कधी मोठ्या नोटांचा तुटवडा अशा घटना ऐकिवात होत्या. तसेच नवीन नोटांच्या चलनानंतर बऱ्याचदा प्रिंटींग मिस्टेकही उघडकीला आल्या. अशीच घटना आज भंडाऱ्यात उघडकीला आली. एटीएम मधून नोटा निघाल्यानंतर त्यातील शंभराच्या एका नोटावर दोन्ही बाजूंनी महात्मा गांधीजींचे चित्र होते. तसेच एका बाजूवरील १०० चे आकडेही उलटे आहेत. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार (कोरंभी) येथील रहिवासी सुधाकर साठवणे हे राजीव गांधी चौकात स्थित युनीयन बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले होते. त्यांनी ६ वाजून २ मिनिटांनी दोन हजार रुपयांचे विड्रॉल एटीएम मधून केले. यावेळी त्यांना ५०० रुपयांच्या तीन व शंभर रुपयांच्या पाच नोटा मिळाल्या. त्यापैकी शंभराची एक नोट यावर दोन्ही बाजूंनी गांधीजींचे चित्र असल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी तिथे उपस्थितांनाही दिली. तसेच या नोटवर गव्हर्नरच्या दोन स्वाक्षऱ्या असून १०० रुपये हे ००१ असे प्रिंट झाले आहे. भंडाऱ्यात पहिल्यांदाच शंभराची नोट या प्रकारे एटीएम मधून प्राप्त झाल्याने चर्चेला पेव फुटले आहे. ही घटना सायंकाळी ६ नंतर घडल्याने बँकही बंद झाली होती. परिणामी त्यांना याबाबतची माहिती बँक प्रशासनाला कळविता आली नाही. रक्कम मिळाल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर दोन हजार रुपये अकाऊंटमधून कपातीचा संदेशही प्राप्त झाला असून याची माहिती बँकेला कळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)