शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

समाजप्रबोधन, आधुनिकतेचा संदेश देणारा ‘गणराय’

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

धार्मिक उत्सव, सण म्हटलं की, समाजप्रबोधन तर दूरचं. मात्र, वर्गणी गोळा करून कार्यक्रम घेणारे पदाधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात.

लोकमत शुभवर्तमान : मोहगाव (देवी) येथील वर्गणी गोळा न करणारे मंडळप्रशांत देसाई  भंडाराधार्मिक उत्सव, सण म्हटलं की, समाजप्रबोधन तर दूरचं. मात्र, वर्गणी गोळा करून कार्यक्रम घेणारे पदाधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात. याबाबीला फाटा दिला तो, मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील एका मंडळाने. त्यांनी स्थापित केलेली मुर्ती आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश देणारी असून गावात वर्गणी गोळा न करता मंडळाच्या सदस्यांनी सर्व खर्च वाटून घेत गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. मंडळाचा हा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मोहगाव (देवी) हे ३,५०० लोकवस्तीचे गाव. येथील हनुमान व्यायाम मंडळाचे पदाधिकारी हा गणेशोत्सव साजरा करतात. मागील १२ वर्षांपासून व्यायाम मंडळाच्या खोलीत गणरायाची स्थापना करण्यात येते. यावर्षी पाळण्यावर विराजमान असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मंडळाने आजपर्यंत दुष्काळ परिस्थिती, वाहतुकीची समस्या यासोबतच समाजातील वाईट चालीरिती, प्रथा, परंपरा, स्त्री भ्रुणहत्या, हुंडाबळी याशिवाय महिलांवरील अत्याचार यावर आधारित देखावे किंवा नाटिका साजरे करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी मंडळाने श्रींच्या माध्यमातून आधुनिकतेचा देखावा तयार केला आहे.पाळण्यावर विराजमान गणरायाच्या एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात टिव्हीचा रिमोट कंट्रोल असून त्यांच्यासमोर असलेल्या टिव्हीवर प्रबोधनात्मक कार्यक्रम किंवा ताज्या घडामोडीसाठी वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्या सुरू राहतात. सोबतच एका बाजूला वृत्तपत्र व लॅपटॉप ठेवण्यात आले आहे. या आधुनिक देखाव्यातून समाजाने बोध घ्यावा, जणू असाच संदेश गणराया देत असल्याचा भास होतो. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची कामे करण्याची सुचना द्यावी लागत नाही, ते स्वत:ची जबाबदारी ओळखून सर्व कामे करतात.गणेशोत्सवादरम्यान सर्व सदस्य झेपेल एवढा खर्च उचलून गणरायाची आराधना करतात. उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकदाच २१ रूपये देऊन प्रवेश घेतल्यानंतर सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याची स्पर्धकांना संधी मिळते. विजेत्यांना बक्षीस देण्यात येते व महाविजेत्या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते. दरम्यान रक्तदान, नेत्रदान, रक्तगट तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येते. मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मारबते, उपाध्यक्ष अमित डोकरीमारे, सचिव संजय वाडीभस्मे तर मार्गदर्शक प्रकाश काळे, रामकृष्ण चकोले, नरेश दिपटे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ गणेशोत्सवासाठी सहकार्य करीत आहेत. या मंडळाने साजरा केलेला हा आधुनिक युगातील गणेशोत्सव खरोखरचं समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.