शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रातीच्या साहित्यांनी गजबजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:29 IST

नववर्षाला प्रारंभ झाल्यानंतर लगबग लागते ती मकरसंक्रांतीच्या तयारीची. वाणाच्या साहित्यांसह कापडांची दुकाने ग्राहकांमुळे गजबजू लागली आहे. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर बाजारपेठेत लाखोंची उलाढालही या निमित्ताने होणार आहे.

ठळक मुद्देलाखोंची होते उलाढाल : बाजारात वाण खरेदीसाठी महिलांची गर्दी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नववर्षाला प्रारंभ झाल्यानंतर लगबग लागते ती मकरसंक्रांतीच्या तयारीची. वाणाच्या साहित्यांसह कापडांची दुकाने ग्राहकांमुळे गजबजू लागली आहे. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर बाजारपेठेत लाखोंची उलाढालही या निमित्ताने होणार आहे.मकरसंक्रांती हा तसा महिलांचा सण. परंतु शास्त्रोक्त दृष्टीने बघितल्यास १४ जानेवारीला सुर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकरसंक्रांतीच्या या सणाला पुण्यकाल म्हणूनही संबोधले जाते. यात सोन्या-चांदीच्या वस्तु खरेदीसह वाहन व संपत्ती खरेदी विक्रीचा व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असतो. दरम्यान बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढल्याने बाजारात रंगत आली आहे.पतंग विक्रीलाही उधाणसंक्रांतीचा सण जसजसा जवळ येत जातो तस तसा पतंग विक्रीचाही व्यवसायातही वाढ होत जाते. मोठ्या बाजारातील शर्मा बालोद्यान परिसरात असलेल्या पतंगीच्या दुकानात बाल-गोपालांची सकाळी ६.३० वाजतापासूनच गर्दी दिसून येते. नॉयलॉन मांजावर बंदी आहे. त्यामुळे पतंग शौकीन साध्या मांजावरच पतंगाचा डावपेच साधत आहे.वाण खरेदीसाठी गर्दीमकरसंक्रांतीच्या सणाला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. संक्रांतीच्या निमित्ताने वाण वाटण्यासाठी विविध साहित्य खरेदी केली जातात. सध्या गांधी चौक ते पोष्ट आॅफिस चौकापर्यंतच्या मार्गावर वाण विक्रीच्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. यात महिलांची गर्दी दिसून येते. चमचे, वाट्या, प्लेट्स, करंडे, ग्लास या वाण साहित्याची सर्वात जास्त विक्री होत असते. यात बालकांसाठी लूट करण्याचे साहित्यही आहे.