शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भावी अभियंत्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:01 IST

तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देआलोक मिश्रा : एमआईईटीमध्ये उद्योजगता विकास कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.स्थानिक मनोहर भाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे केंद्र शासनाच्या विज्ञान व तकनिकी मंत्रालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे विभागीय आयुक्त आलोक मिश्रा, माझी विभागीय आयुक्त् व उद्योजकता प्रशिक्षक शुभांग गोरे, प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे उद्योग तरूण अभियंते सुरू करू शकतात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांसाठी आवश्यक असणाºया सर्व घटकांविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संस्थेद्वारे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देवून तरूण अभियंत्यांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.प्रास्ताविक प्रा. शाहीद शेख यांनी केले. दुसºया दिवशी वैभव पांडे यांनी उद्योजकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध व्यक्तीमत्व विकासाच्या पैलूंविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप्पल सिन्हा यांनी बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा व मालाचा खप कसा वाढवावा याविषयी जाणीव जागृती केली. मानवी व्यक्तीमत्वाचा उद्योगाच्या विविध घटकांवर होत असलेल्या सकारात्मक व नकारात्मक बांबींची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गडेगाव व भंडारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विविध उद्योगांना भेटी देवून तिथे प्रत्यक्षात कसे काम होते याची माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेकरिता कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख, प्रा. संजय राजुरकर, प्रा. कोमल मेश्राम, प्रणय लांजेवार, प्रा. तुषार राऊत यांनी सहकार्य केले.