शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा जंगलात गुराख्यावर बिबट्याची झडप, म्हशीमुळे वाचला त्याचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

नेहमीप्रमाणे गुराखी बालचंद राऊत यांनी आपली जनावरे शुक्रवारी जंगलात चारायला नेली होती. अचानक बिबट्याने एका गायीवर हल्ला चढिवला.  बालचंदने आरडाओरडा केला असता त्याच्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. त्याच वेळी एका म्हशीने बिबट्याला पळवून लावल्याने गुराख्याचे प्राण वाचले. काही जण हल्ला करणारा वाघ असल्याचे सांगतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर बिबटाने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्रातील फुटाळा  (वाडा) जवळील नागदेव जंगल परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. म्हशीने बिबट्याला पिटाळून लावल्याने गुराख्याचा जीव वाचला. जखमीवर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. बालचंद संपत राऊत (४५), रा. फुटाळा, ता. मोहाडी असे जखमीचे नाव आहे. फुटाळा गावाचा परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या गावात दुसरा रोजगार नसल्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पालनपोषण करतात. नेहमीप्रमाणे गुराखी बालचंद राऊत यांनी आपली जनावरे शुक्रवारी जंगलात चारायला नेली होती. अचानक बिबट्याने एका गायीवर हल्ला चढिवला. बालचंदने आरडाओरडा केला असता त्याच्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. त्याच वेळी एका म्हशीने बिबट्याला पळवून लावल्याने गुराख्याचे प्राण वाचले. काही जण हल्ला करणारा वाघ असल्याचे सांगतात. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता बिबट असेल असा अंदाज व्यक्त केला. चौकशीअंती नेमका बिबट्या की वाघ हे कळेल, असेही सांगितले. तुर्तास गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनाधिकारी रुग्णालयात दाखल- हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले. आमदार राजूभाऊ कारेमोरे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, वनपरिक्षेत्र अधिकारी केशव राठोड यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. सध्या त्याची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. बिबट्याने त्याच्या कानशिलाच्या बाजूने पंजाने जखमा केल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघ