शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

भरधाव टिप्पर घरात शिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:09 IST

रेतीचा टिप्पर अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. यात गभणे यांच्या अंगणात असलेल्या दोन दुचाकी चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला.

ठळक मुद्देखापा येथील घटना : दोन दुचाकींचा चेंदामेंदा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेतीचा टिप्पर अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. यात गभणे यांच्या अंगणात असलेल्या दोन दुचाकी चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला.तुमसरकडून नागपूरकडे रेती वाहून नेणारा ट्रक क्रमांक (एम.एच. ४० के ७६३९) अनियंत्रित होऊन खापा (तुमसर) येथील शुभम गभणे यांच्या घरात शिरला. गभणे यांचे घर रस्त्याशेजारी आहे. हा ट्रक घरात शिरला त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला. नशिब बलवत्तर म्हणून गभणे कुटुंबिय बचावले. घरासमोरील दोन दुचाकींचा यात चेंदामेंदा झाला. सुदैवाने अनर्थ टळला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.तुमसर, भंडारा व रामटेक मार्गावर रेतीची राजरोसपणे दररोज जड वाहतूक सुरु आहे. खापा येथे दररोज सकाळी व रात्रीच्या सुमारास वाहनतळ असते. भरधाव ट्रक येथून सुसाट वेगाने धावतात. भरधाव वाहनांना नियंत्रित करणारी पोलीस यंत्रणा याठिकाणी कधीही दिसत नाही. एका महिन्यापूर्वी खापा चौकात भरदिवसा रेतीच्या टिप्परने एका तरूणाचा बळी घेतला होता. खापा चौकात नियमित पोलीस चौकीची गरज आहे. परंतु पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतर काँग्रेसचे पदाधिकारी डॉ.पंकज कारेमोरे, प्रा.कमलाकर निखाडे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. अपघातस्थळी गर्दी केली होती. अनियंत्रित ट्रक चालकाविरूद्ध कारवाई करण्यात यावी आणि गभणे यांच्या घराची दुरूस्ती करण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी डॉ.पंकज कारेमोरे यांनी केली आहे.