शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'ग्रीप'विनाच रोहित्रातून जीवघेणा वीज प्रवाह

By admin | Updated: September 20, 2015 00:56 IST

परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, ...

चुल्हाडात म्हैस ठार : वारंवार विजेचा लपंडाव, गावकरी त्रस्तचुल्हाड (सिहोरा) : परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, विजेच्या धक्क्याने चुल्हाडात म्हैस ठार झाली आहे. त्यामुळे नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.विजेचा लपंडाव, साहित्यांचा अभाव, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष यामुळे सिहोरा येथील वीज वितरण कंपनीचा कार्यालय चर्चेत आलेला आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांचा यात दोष नसतांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. या कार्यालयात सिहोरा १ आणि सिहोरा २ अशी विभागणी करण्यात आली आहे. या विभागांना स्वतंत्र यंत्रणा संचालित करीत आहे. ३३/११ केव्हीचे केंद्र मोठ्या आंदोलनाने प्राप्त झाले आहे. नागरिकांना सिंगल फेज व शेतकऱ्यांना थ्री फेज अशी वीज जोडणीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे परिसरात नागरिकांना भारनियमनातून मुक्ती मिळाली आहे. परंतु शेतकरी पुरता खचला आहे. २४ पैकी ८ तास वीज पुरवठा शेतकऱ्यांचे पंपाला होत आहे. यामुळे नळ योजनांचे नियोजन ढासळले आहे. थ्री फेज वीज पुरवठ्याच्या कक्षात या नळ योजना आहेत. पिण्याचे पाणी आणि शेतीचे उत्पादन भारनियमनाच्या गणितावर अवलंबून आहे. दरम्यान रोहित्राची अवस्था वाईट झाली आहे. या रोहित्रांना ग्रीप नाहीत. थेट फ्युज तार जोडली जात आहेत. हां प्रकार जीवघेणा असताना कुणी पुढारी बोलते होत नाहीत. ग्रीप नसल्याने कधीही वीज पुरवठा खंडीत होत आहे. गावातील काही अनुभवी तरुण ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज आता गरज झाल्याने अप्रशिक्षित तरुणाचा जीव वेशीवर टांगल्या जात आहे. निश्चितच वीज वितरण कंपनी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. जनमित्रांना अनेक गावांचा कारभार असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे.या कार्यालयात तक्रार अथवा गाऱ्हाणे सांगीतली असता, साहित्य नसल्याचे ऐकविण्यात येत आहे. हे सत्य असले तरी अशा उत्तराने समस्या निकाली निघणार नाही. चुल्हाडात शेतकरी नंदू पारधी गावाचे शेजारी जनावरे चारत असताना रोहित्रानजिक संपूर्ण जागेला करंट होते. या विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांची म्हैस जागीच ठार झाली आहे. यात ५० हजाराचे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा आधार हिरावला आहे. या धक्क्यात शेतकरी नंदू पारधी हे थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनी कार्यालयात देण्यात आली आहे. (वार्ताहर)