शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘डायट’च्या उभारणीला निधीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:19 IST

भावी शिक्षकांना घडविण्याचे कायर करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंधारात आहे.

२० कोटींचा प्रस्ताव : बांधकामाचा खर्च ४० टक्यांनी वाढला, शासन-प्रशासनाची उदासीनताइंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भावी शिक्षकांना घडविण्याचे कायर करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंधारात आहे. चार वर्षांपूर्वी प्रसञतावित असलेल्या व पाऊण कोंटीचा खर्च झालेल्या या बांधकामाची किंमत सद्यस्थितीत ४० टक्यांनी वाढली आहे. कोट्यवधींची गरज असताना राज्य शासनाने निधीसाठी हात वार केले आहेत. जिल्ह्यातील नावाजलेली प्रशिक्षण संस्था म्हणून डायटचा नेहमी उल्?ेख केला जातो. आजपर्यंत शेकडो प्रशिक्षणार्थी शिक्षक पदविका प्राप्त करून ज्ञानार्जन करण्याच्या कार्याला लागले. आजही शिक्षक घडविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. शहरातील लाल बहादूर शास्त्री चौक परिसरात डायटची इंग्रजकालीन वास्तू आहे. सदर वास्तूची मालकी मात्र लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची आहे. ज्याप्रमाणे शास्त्री विद्यालयाच्या वर्गखोलींचे बांधकाम आहे, त्याचप्रमाणे डायटमधील खोल्यांचा आकार आहे. परंतू सदर इमारत जीर्ण झाली असून काही ठिकाणाहून तडे गेले आहेत. भविष्यकालीन विचार व वाढता कामाचा व्याप याला अनुसरून जकातदार कन्या शाळा परिसरातील दक्षिण क्षेत्रातील जवळपास ५ एकरमध्ये डायटची नवीन प्रशाकीय इमारत बांधकामाचा चंग बांधण्यात आला. यासाठी सन २०१३-१४ मध्ये यासंदर्भात अंदाजपत्रक व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. सदर बांधकामासाठी १५ कोटी ३९ लक्ष ११ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याबी बाब प्रस्ताव होती. यापैकी केंद्राकडून बांधकामासाठी ८० लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. निधी मिळताच जकातदार कन्या शाळेतच्या जागेत धडाक्यात बांधकामही सुरू झाले. पंरतू ऐनवेळी पुन्हा माशी शिंकली. पिल्लर उभे करून काही ठिकाणी भिंतीही उभारण्यात आल्या. बांधकाम मोठया स्वरूपात असल्याने आलेला संपूर्ण निधी खर्च झाल्याने व पुढील खर्चासाठी निधी न आल्याने आजतागायत बांधकाम रखडलेले आहे. सद्यस्थितीत बांधकामासाठी २० कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. चार वर्षांचा कालावधी लोटूनही राज्य किंवा केंद्राकडून निधी न मिळाल्याने डिजिटायझेशनच्या माध्यमातून तंत्रस्रेही शिक्षक घडविण्यात जिल्हा माघारणार काय? अशी भितीही व्यक्त केली जात आहे. बांधकामात या बाबींचा समावेशजकातदार कन्या शाळा परिसरातील ५ एकर जागेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्येची नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात अत्याधुनिक वर्गखोल्या, पुरूष-महिला प्रशिक्षणार्थ्यांसाठी होस्टेल, कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, सुरक्षा भिंत बांधकाम आदींचा समावेश आहे.डायटच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. निधी मंजूर झाल्यास काम सुरू करण्यात येईल.-अभयसिंह परिहारप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा.