पर्यावरण संतुलित ग्राम योजना : ७०५१.१८ लाखांचा निधी वितरितदेवानंद नंदेश्वर - भंडारापर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजनेत सन २०१२-१३ या पहिल्यावर्षी १,८७२, दुसऱ्यावर्षी १,८६६ आणि तिसऱ्यावर्षी ४,१७४ अशा निकष पूर्ण करणाऱ्या ७,९१२ ग्रामपंचायतींना राज्य शासनाने पात्र ठरविले आहे. पहिल्या वर्षातील ग्रामपंचायतींना ६,००६ लाख रूपये व दुसऱ्या वर्षातील ग्रामपंचायतींना ५,२८२.३० लाख रूपये आणि तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींना १२,१२०.२८ लाख रूपये असा एकूण २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करायचा आहे. त्यापैकी शासन निर्णयान्वये ७,०५१.१८ लाख रूपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन २०१४-१५ मध्ये १३,५०० लाख रूपये अर्थसंकल्पित निधीपैकी आता ८,१०० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येत आहे. हा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरून आरटीजीएस (रिअल टाईम ग्रास सेटलमेंट) प्रणालीचा वापर करून थेट संबंधित पात्र ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचा आहे. या निधीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियंत्रक अधिकारी राहतील. विभागीय आयुक्त हे त्या-त्या विभागाचे सनियंत्रक राहतील.
७,९१२ ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाखांचा निधी
By admin | Updated: January 18, 2015 22:37 IST