शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यानुभव निदेशकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:29 IST

विद्यार्थ्यांमधील कौशल्याला चालना देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती केली. मात्र आजही हे निदेशक अत्यल्प मानधनावर राबत आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे भंडारा येथील कला क्रीडा व कार्यानुभव निदेशकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अल्प मानधनावर राबत आहेत निदेशक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांमधील कौशल्याला चालना देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती केली. मात्र आजही हे निदेशक अत्यल्प मानधनावर राबत आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे भंडारा येथील कला क्रीडा व कार्यानुभव निदेशकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.राज्य शासनाने कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांचे २०१२-१३ मध्ये नियुक्ती केली. त्यात पाच महिने व दहा महिने कालावधीत पाच ते सात च्या वर्गासाठी शिक्षक देण्यात आले. कालांतराने या निदेशकांना पुन्हा शाळेवर घेतले नाही. या काळात निदेशकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. निदेशकांच्या बाजूने निकालही देण्यात आला. कायमस्वरुपी अर्धवेळ असा निकाल दिला. परंतु राज्य शासनाने अंशकालीन निदेशकांना कायमस्वरुपी नियुक्ती न देता नवीन शासन निर्णय काढून न्यायालय नियमांची पायमल्ली केली. या निदेशकांना प्रतितास ५० रुपये ४८ तासिकेच्या मर्यादेत मानधन अनुज्ञेय आहे. निदेशकांना मोजक्या मानधनात काम करावे लागत असून केंद्र शासनाने २० जानेवारीच्या पत्रकानुसार सात हजार रुपये मासिक मानधन मान्य केले आहे. तरीसुद्धा राज्य शासन मानधन देताना ७ आॅक्टोबर २०१५ चाच शासन निर्णय पुढे करीत आहे. अगदी अल्प मानधनात राबणाऱ्या या निदेशकांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.शासन सेवेत नियमित करावे, मानधनात वाढ करावी, नियुक्ती पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत करावी, सेवाज्येष्ठता प्रदान करावी, पहिली ते आठवी अंशकालीन अतिथी निदेशकांची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी मंगळवारपासून निदेशक येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहे. यामध्ये सतीष पटले, तुफानसिंह चव्हाण, महेंद्र हाडगे, मनोहर गौपाले, गणेश झिंगरे, विलास झलके, सविता बन्सोड, हर्षा नंदनवार, सुरेश भैसारे, विनोद कातोरे, नेकराज वझाडे, चुडाराम ठाकरे, जगदीश पडोळे, संतोष लांजेवार, ज्योती टेंभरे, योगेश निपाने, जयश्री गोंधुळे, शेषराव शेंडे, केशव सरजारे, मुकेश जांगळे, फुल्लके आदींचा समावेश आहे.