शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात बचत गटाचा मोर्चा

By admin | Updated: July 11, 2017 00:18 IST

जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व एजंट कर्जधारक असलेल्या महिलांना मानसिक त्रास देऊन शारीरिक त्रास देण्याची धमकी देत आहेत,...

लाखोंची फसवणूक : मायक्रो फायनान्सच्या एजंटवर कारवाई करालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व एजंट कर्जधारक असलेल्या महिलांना मानसिक त्रास देऊन शारीरिक त्रास देण्याची धमकी देत आहेत, अशांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख राकेश चोपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे भरपावसात या महिला न्यायासाठी तग धरून होत्या. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मायक्रो फायनान्स कंपनीचे एजंट कर्जधारक महिलांच्या घरी जावून पैसे वसुलीसाठी धमकी देतात. तसेच पंधरा ते वीस एजंट जबरदस्तीने पैसे वसुल करु अशी दमदाटी देवून मानसिक व शारीरिक त्रास देण्याची धमकी देतात. अशा एजंटांवर कारवाई करुन होणाऱ्या मानसिक त्रासापासून मुक्त करण्यात यावे, अन्यथा आम्ही आत्महत्या करावी काय? असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राकेश चोपकर, सचिन मेश्राम, प्रमोद केसरकर, प्रविण मेहर, दिनेश मांढरे, सेलोकर, मंदा वरकडे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.