शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा वनकार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: December 23, 2016 00:31 IST

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र यांना माडगी (टेकेपार), पुरकाबोडी परिसरातील जंगल हस्तांतरीत करण्यात येऊ नये,

अधिकाऱ्यांना निवेदन : एफडीसीएमला जंगल हस्तांतरीत करू नका भंडारा : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र यांना माडगी (टेकेपार), पुरकाबोडी परिसरातील जंगल हस्तांतरीत करण्यात येऊ नये, या मागणीसाठी माडगी व पुरकाबोडी येथील ग्रामस्थांनी माडगी येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. वनाधिकाऱ्याला मागण्याचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. माडगी व पुरकाबोडी गावाचे जंगल वनविभाग भंडारा (प्रादेशिक) यांच्याकडे आहे. सदर जंगल फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र (एफडीसीएम) ला हस्तांतरीत करण्याचे शासनाचे आदेश आहे. एफडीसीएमचे कर्मचारी माडगी परिसरातील जंगलाची पाहणी करीत आहे. या जंगलाशेजारी माडगी, टेकेपार, खुर्शीपार, खुटसावरी, पिंपळगाव, पुरकाबोडी, येटेवाही, तिर्री, शेगाव ही गावे आहेत. या गावामध्ये आदिवासी बांधवांची वस्ती आहे. या जंगलामधून माडगी परिसरातील गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मोहफूल, चार, चारोळ्या, तेंदू संकलन, डिंक, सिंधीपासून झाडू, मध गोळा करण्याची कामे करतात. हे जंगल एफडीसीएमला हस्तांतरीत झाल्यास माडगी परिसरातील नागरिकांवर उपासमारीचे संकट ओढवू शकते. सदर वनक्षेत्र एफडीसीएमला हस्तांतरीत न करता वनविभाग भंडारा (प्रादेशिक) यांच्या ताब्यात राहू द्यावे, त्यासंदर्भात ग्रामपंचायतींनी ठराव देखील घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माडगी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) व उपवनसंरक्षक यांना पाठविले आहेत. निवेदनावर सरपंच हेमलता ढोणे, प्रमोद नागापुरे, सुधाकर ढोणे, प्रशांत गजभिये, संदीप दायरे, देवांगना नळपते, सुलभा खोब्रागडे, रंजना ठवरे, सीता क्षीरसागर, नीळकंठ रणदिवे, कवळू शांतलवार, पुरूषोत्तम पाल, किशोर मस्के, राजू मस्के, गोवर्धन चेटूले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)