शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार कर्मचाऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:34 IST

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तर्फे स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तर्फे स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.आयटक प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनद्वारे स्थानिक बसस्थानकापासून कॉ. शिवकुमार गणवरी, जिल्हा संघटक राजू बडोले, जिल्हा सचिव भाग्यश्री उरकुडे, तालुका अध्यक्ष प्रमिला लसुन्ते यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शापोआ कर्मचाºयांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, माधनाऐवजी किमान वेतन लागु करावे, शापोआ कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती तथा सामाजिक सुरक्षा जसे भविष्य निर्वाह निधी पेन्शन आदी लागु करण्यात यावे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. भंडारा यांचे परिपत्रकाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावे, स्वयंपाकी व मदतनीस हे अंशकालीन कर्मचारी आहेत. तेव्हा त्यांच्या कामाचा वेळ ठरवून देण्यात यावे, शापोआ कर्मचाºयात गणवेश, परिचयपत्र देण्यात यावे, काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्या शालेय पोषण आहार कर्मचाºयांच्या मोर्चा वगैरे सारखे आंदोलनाच्या दिवशी त्यांना कामावर येण्यास सक्ती करतात. हे कामगारांना मिळालेल्या कायदेशिर हक्काचे व संवैधानिक अधिकाराचे उल्लंघन आहे. तेव्हा अशा प्रकारचे व्यवहार करण्याताना सक्त मनाईची ताकीद देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्यात. मोर्चात तालुका पदाधिकारी वर्षा पडोळे, प्रतिमा कान्हेकर, किरण इस्कापे, तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील पोषण आहार स्वयंपाकीनी सहभागी झाल्या होत्या.