भंडारा : भूसंपादन कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, धानाला हमी प्रति क्विंटल ३,५०० रु. भाव देण्यात यावा. आदी मागण्यासह शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या घेऊन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या २२ मे रोजी सकाळी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. २२ मे रोजी आयोजित मोर्चाची रुपरेषा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.मुठभर लोकांचे हित साधून शेतकऱ्यांना दारिद्रयात लोटणारा कायदा केंद्र सरकारने लोकसभेत पारीत केला. धानाला हमी भाव प्रति क्विंटल ३५०० रु. भाव देण्यात यावा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अवकाळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी. केरोसीनच्या कमी केलेल्या कोटा पुर्ववत करण्यात यावा व भारनियमन बंद करुन कृषी पंपाना पूर्ण वेळ विद्युत पुरवठा उपलब्ध करावा आदी मागण्या लावून धरण्यात येणार आहे.मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुका स्थळी सभा आयोजित करुन मोर्चाची माहिती शेतकऱ्यामार्फत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. बीआरजीएफ मधील कामे ग्रामपंचायतीना मिळाले काय, धान खरेदी केंद्र सुरु करावे, धानाला बोनस देण्यात यावा, केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळावेत, सामुहिक वनहक्क पट्टे देण्यात यावे आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येऊन धडक मोर्चात सदर विषय लावून धरुन शासनाकडे मागणी करण्याचे ठरविण्यात आले.या बैठकीला प्रामुख्याने सुनिल फुंडे, जयंत वैरागडे, अविनाश ब्राम्हणकर, नरेश डहारे, नगराध्यक्ष बाबु बागडे, अभिषेक कारेमोरे, धनराज साठवणे, श्रीकांत वैरागडे, नलिनी कोरडे, कल्याणी भुरे, रुबी चढ्ढा, सुमेध श्यामकुवर, राजेश डोंगरे, राजश्री गिरेपुंजे, नरेंद्र झंझाड, वासु बाते, देवचंद ठाकरे, डॉ. विकास गभणे, नरेश चुन्ने, लोमेश वैद्य, अंगराज समरीत, विठ्ठलराव कहालकर, शैलेश मयुर, सुरेश रहांगडाले, रामदयाल पारधी, चंद्रशेखर टेंभुर्णे, जुल्फीकार हुमणे, डॉ. जगदीश निंबार्ते, राजू हेडाऊ, संजय केवट, ज्योती टेंभुर्णे आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राकाँ काढणार मोर्चा
By admin | Updated: May 10, 2015 00:50 IST