राजू बांते मोहाडीवंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ११ जुलैला सार्वत्रिक शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षण करण्यात आला. या सर्वेक्षणात तालुक्यात ३३ बालके शाळाबाह्य दिसून आली. ही सर्व बालके शाळेत प्रवेशित झाली असून आता पुस्तकांशी मैत्री करणार आहेत.प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे. पण, काही पालक विविध कारणांमुळे बालकांना शाळेत पाठवित नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, नियमित शाळेत येणे, त्याल दर्जेदार शिक्षण मिळणे याबाबतचा हक्क बालकांना प्राप्त झाला आहे. अशा शिक्षणाच्या हक्कापासून दूर गेलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शनिवारी सार्वत्रिक शाळाबाह्य मुलांचे एक दिवसीय सर्वेक्षण करण्यात आले. मोहाडी तालुक्यात मोहगाव देवी, नेरी, करडी, कांद्री, पालोरा, आंधळगाव, जांब व हरदोली/झंझाड या आठ केंद्राच्या हद्दीतील गावात शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षण करण्यात आला. ३० हजार ३४ कुटुंबाचा स्थलांतरीत कुटुंबाचा, झोपडपट्टी, हॉटेल, वीटभट्टी, रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे ३२४ प्रगणक अधिकारी, ८ विशेष पथक, १६ झोनल अधिकारी, ८ केंद्रप्रमुख, ४ विस्तार अधिकारीच्या ताफ्यासह सर्वेक्षण करण्यात आला. सर्वेक्षणातून एकही बालक सुटणार नाही याची काळजी घेण्यात आली. अधिनस्त यंत्रणेस सर्वेक्षणात मोहाडी तालुक्यात ३३ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध लागला. यात मोहगाव केंद्र - २, नेरी १२, करडी ९, जांब ७ व वरठी ३ या केंद्रात शाळा बाह्य बालके सापडली. यात कधीच शाळेत न गेलेली १४ मुले व ६ मुलींचा समावेश आहे. तसेच मधात शाळा सोडलेली ७ मुले व ६ मुलींचा समावेश आहे. यात सर्वात जास्त नेरी केंद्रातील वरठी येथील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या ११ बालकांना शाळा बाह्य समजून सर्वेक्षणात अंतर्भाव करण्यात आला. या ३३ शाळा बाह्य बालकांत आचल प्रकाश तिवसकर, अक्षय किशोर तिवसकर, क्रिश पांडूरंग सिडामे, उर्वशी पांडूरंग सिडामे, तृप्ती पांडूरंग सिडामे, सीमा प्रकाश तिवसकर, प्रियंका किशोर तिवसकर, गीता मोहीन मेश्राम, चंद्रकांत हिरालाल नारंगी, आचल सुनिल सोनवाने, राजेली किशोर सोनवाने, गौरव राजकुमार राऊत, रोशनी भारत राऊत, गौरी हौशीलाल सोनवाने, दामिनी किशोर सोनवाने, दुर्गश धनलाल शहारे, शुभांगी वसंत कुंभारे, सुनिल सोमनाथ कुंभारे, राजकुमार लिंबाजी शिवनकर, आकाश लिंबाजी शिवनकर, विलास रविदास मराठे, सिराज शेख, हकीम शेख, शाहेब अली शेख, समीम शेख, इसहाक शेख, शोहेब शेख, राहोब जुबेर शेख, मुर्तझा शेख, रिझवान शेख, अजमेर अली शेख, गोपाल कुमार मनोज कुमार सिंग या बालकांचा समावेश आहे. सर्वच शाळा बाह्य बालकांना नजीकच्या शाळेत लगेच प्रवेशित करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी सांगितले.शाळा बाह्य सर्वेक्षणावर लक्ष देण्यासाठी वरठी व मोहगाव देवी येथे उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांच्यासह तहसीलदार पोहनकर, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साबळे, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, केंद्रप्रमुख जयंत उपाध्याय उपस्थित होते.शाळा बाह्य उपक्रमांच्या संपूर्ण यशस्वितेसाठी तालुका आणि गाव पातळीवर समित्या नेमण्यात आल्या होत्या. वातावरण निर्मितीसाठी गावात व तालुका ठिकाणी सभा घेण्यात आल्या होत्या. तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, चार विस्तार अधिकारी, आठ केंद्रप्रमुख, ४२४ प्रगणक, २४ शिक्षकांचा विशेष पथक, १६ झोनल अधिकारी तसेच विषय शिक्षक, अपंग समावेशित शिक्षक, साधन व्यक्ती, पं.स. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटर आदींचे यांनी शाळा बाह्य सर्वेक्षणात प्रत्यक्षरित्या काम केले.चोरखमारी येथे गोपाळवस्तीत दोन बालके, करडी येथे नऊ स्थलांतरीत बालक, जांब येथे सहा स्थलांतरीत बालक, असे स्थलांतरीत परिवारातील सतरा बालकांचा शोध लागला. मोहाडीत टिळक वॉर्डात मधेच शाळा सोडलेल्या दोन विद्यार्थ्यांचा शोध लागलेला नाही, अशी माहिती आहे.
शाळाबाह्य बालकांची पुस्तकांशी मैत्री
By admin | Updated: July 13, 2015 00:46 IST