शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:14 IST

नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे३० डॉक्टरांची चमू : मान्यवरांनी दिला उपस्थितांना आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात, शहरातील व ग्रामीण भागातील हजारो रूग्णांनी आरोग्याची तपासणीसह उपचाराचा लाभ घेतला.संत गाडगेबाबा सांस्कृतिक नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयातील डॉ. शुभम मनगटे यांच्या पुढाकाराने तुमसर येथील रायबहादूर प्राथमिक विद्यालय येथे महाआरोग्य शिबिराचे रविवारला आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, विजयकुमार डेकाटे, कल्याणी भुरे, सभापती मेहताबसिंग ठाकुर, सुनिल पारधी उपस्थित होते.शिबिरामध्ये नागपूर दंत महाविद्यालयातील ३० डॉक्टरांची चमू ज्यामध्ये काळमेघ महाविद्यालयातील सीईओ डॉ. शिवकुमार घोडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विजय गेडाम, जनरल फिजीशियन डॉ. पवार, डॉ.अक्षय मिश्रा व अन्य डॉक्टरच्या चमूने रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचेही वाटप केले.यावेळी बालरूग्ण, दंत तपासणी, डोळ्याची तपासणी, रक्त तपासणी करण्यात येऊन उपचारही करण्यात आले. तर ९० नेत्र रूग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या स्व.काळमेघ महाविद्यालयात बोलाविण्यात आले. त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येईल असे आयोजक डॉ.शुभम मनगटे यांनी सांगितले. यामध्ये विशेष उपचार, दंतरोग्याचे करण्यात आले. अनेक रूग्णांचे दात साफ करण्यात आले तर अनेकांचे दात फिलींग करून देण्यात आले.काहींचे दात काढण्यात आले. यासाठी विशेष महाविद्यालयाची फिरते तपासणी वाहन (डेंटल चेकअप वाहन) आणण्यात आले होते. सकाळी ११ ते ६ पर्यंत मोठ्या प्रमाणात रूग्णांची तपासणी, रक्त तपासणी डोळे, दंत, हार्ट, जनरल सर्व तपासण्या व उपचार नि:शुल्क व औषधही दिले.या शिबिरासाठी डॉ.शुभम मनगटे यांचे वडील नामदेव मनगटे, विजय हटवार, दिलीप गभणे, अशोक आडझा, शैलेश नासरे, निलेश नासरे, सुरेश माधवानी, सुनिल पारधी, विष्णू आडझा, अ‍ॅड.दिपक रावलानी, सुनिल कामळे, सुनिल जिभकाटे, देवेंद्र तलमले, शरद पडोळे, रितेश पडोळे, गणेश वंजारी, शिव माधवानी यांनी प्रयत्न केले. या शिबिरातून तुमसर व परिसरातील नागरिकांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधोपचार करून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली.या महाआरोग्य शिबिरासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावून आरोग्य तपासणी केली. मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला.