शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:16 IST

जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण येत असतात. महिला रुग्णाकरिता अतिशय कमी प्रमाणात रुग्णसेवा ...

१०० खाटांचे रुग्णालय : परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यशलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण येत असतात. महिला रुग्णाकरिता अतिशय कमी प्रमाणात रुग्णसेवा असल्यामुळे महिला रुग्णांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. शासनाने भंडारा येथे १०० खाटांचे रुग्णालयाच्या बांधकामास मंजूरी प्रदान केली असून या बांधकामाकरिता ४३.६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिला रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला. याबाबत आ. परिणय फुके यांनी पाठपुरावा करुन अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.भंडारा येथील १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०१५-१६ च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर कामाच्या अंदाजपत्रकामध्ये विद्युतकरण, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कुंपन भिंत, अंतर्गत रस्ते, मायनर ब्रिज, काँक्रीट ड्रेनेज, रेनवॉटर हॉर्व्हेस्टिंग, फर्निचर, पार्किग व्यवस्था, अग्नि प्रतिबंध उपाययोजना, धर्मशाळा, बाह्यप्रसाधन गृह, जनरेटर, बायोमेडीकल वेस्ट ट्रीटमेंट यासाठी ४३ लाख ८४ हजार रुपयाचे अंदाजपत्रक व आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. आ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला रुग्णालयाच्या बांधकामाला मंजूरी प्रदान करुन अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ठ करण्याबाबतची मागणी केली होती. शासनाने डॉ. परिणय फुके यांच्या मागणीची दखल घेत भंडारा शहरातील १०० खाटाचे महिला रुग्णालय बांधकामाला मंजूरी प्रदान करुन ४३.६० कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली. भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखाच्या वर आहे. यामध्ये सात तालुक्यांचा समावेश असून ६६८ गावे समाविष्ट आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता विशेषत: महिलांकरिता रुग्णसेवा अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे महिला रुग्णांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागते. याकरिता महिला रुग्णालयाकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून ५ आॅगस्ट २०१६ रोजी संचालक आरोग्य सेवा यांचेकडे ४३.६० कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. अनेक वर्षांपासून भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.