शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:50 IST

चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ठळक मुद्देरघुनाथदादा पाटील : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा भंडाऱ्यात पोहचली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.शहिदांना अभिवादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा मंगळवारला भंडाऱ्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यातील विविध ४० शेतकरी संघटनांनी सुकानु समिती स्थापन केली. त्यानंतर १९ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून राज्यव्यापी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ही शेतकरी जागृती यात्रा कोकण, मुंबई, कर्नाटक, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भासह आतापर्यंत १६ जिल्ह्यात पोहोचली असून राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शहीद संबोधून शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक मोबदला देण्याची गरज आहे. असे असताना कृषी मूल्य आयोग लागवड खर्चाच्या आधारावर समर्थन मूल्य देत नाही. स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ही शिफारस केली आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेने आता जनतेच्याच न्यायालयात आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पाटील म्हणाले, निर्यातबंदी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांमुळे राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हितासाठी आवाज उचलणारे सभागृहात मौन धारण करून राहतात. काँग्रेसने जे केले तेच भाजपही करीत असल्याचा आरोप पाटिल यांनी केला. पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा किसान संघटनेचे गणेशकाका जगताप, सत्यशोधक किसान सभेचे किशोर ढमाले, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, ऊस कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद भालेकर व पदाधिकारी उपस्थित होते.