शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात देश वेठीस गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:58 IST

भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आंधळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही. त्यामुळे जनतेसह शेतकरी हा हलवादिल झाला आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हक्काची आहे. जनतेची फसवणूक करून सामान्यांची थट्टा मोडत आहे. अशा भुलथापा देणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकर कुकडे यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आंधळगाव येथे आयोजित प्रचार सभेत केले.यावेळी किरण अतकरी, के.के. पंचबुद्धे, कलाम शेख, रमेश पारधी, राजुभाऊ कारेमारे, आनंदराव वंजारी, प्रमोद तितिरमारे, सिमा भुरे, सरपंच मोहिनी गोंडाणे, पुरूषोत्तम बुराडे, संजय मते, संजय टिकापाचे, रामरतन खोकले, राकेश कारेमोरे, बाबुराव मते, विनोद डोंगरे, रतिराम बुराडे, श्रीकांत येरपुडे, गजानन झंझाड, प्रभू मोहतूरे, विजय पारधी, निरंजन पारधी, अरुण तितिरमारे, श्याम कांबळे, आकाश बोंद्रे, उषा धार्मिक, सदाशिव ढेंगे, गणेश बांडेबुचे, सुनिल ठवकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार पटेल म्हणाले, शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. या सरकारने अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही, धानाला भाव दिले नाही. आता इंधनाची दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. जनतेला भूलथापा देण्याचे कार्य सरकारने केले आहे. संचालन प्रदीप बुराडे तर, आभार प्रदर्शन संजय मते, राकेश कोरमोरे यांनी केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल