शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:44 IST

तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली.

ठळक मुद्देउपोषणाचा तिसरा दिवस : प्रकरण अशोक लेलँड कारखान्याच्या अतिक्रमणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली. अद्यापही अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरविल्यामुळे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.सरपंच अनिता शेंडे, दुर्गा मेश्राम, रेखा वासनिक, अनुसया नागदेवे असे प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्या महिलांची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत राजेगाव अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा (रिठी) गावातील जमीनीवर अशोक लेलँड कारखान्याने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले. ते अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देवून चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. परंतु कारवाई करण्यात आली नाही. कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, सरपंच अनिता शेंडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी कारखान्याचे अरविंद बोरडकर यांच्याविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी. कारखान्यासमोर प्रजासत्ताकदिनी करण्यात आलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यात यावे यासह अन्य मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. सरपंचासह अन्य १३ जणांनी १ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. यात प्रकृती खालावलेल्या महिलांसह हिवराज शेंडे, प्रणय झंझाड, अनुप शेंडे, छत्रपती सार्वे, आनंदराव गंथाडे, अमरदीप गणवीर, विशाल रामटेके, धर्मेंद्र सुखदेवे, तुकाराम झलके यांचा समावेश आहे.