शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

तालुक्यातील लवारी, उमरी या रेतीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यामुळे रात्रीच महसूल विभागाचे नायब तहसीलदार पवार, तलाठी शेखर ठाकरे, हटवार, बिसेन हे दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत तीन ट्रॅक्टरला घाटावर रेतीची तस्करी करताना पकडून तहसील कार्यालयात आणले. 

ठळक मुद्देपोलिसांसमोर ट्रॅक्टरचालक पळाला : तालुक्यात रेती तस्करी जोरात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :  तालुक्यात रेती तस्करी खुलेआम सुरू आहे. यावर महसूल विभाग कार्यवाही करीत असले तरी अवैध रेती तस्करी पूर्णपणे थांबत नाही. रात्रीपासून महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी रेतीघाटावर तळ मांडून बसले. यात चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले, मात्र एक ट्रॅक्टरचालक पोलिसांना पाहून वाहनासह पळून गेला.  पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही, हे विशेष. तालुक्यातील दोन रेतीघाटांचे लिलाव झाले असून, उर्वरित रेतीघाटांचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे ज्या घाटांतील लिलाव झाला त्या घाटांतून रेती विकत घ्यावी लागते. म्हणून   रेती तस्कर ज्या रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत त्या रेतीघाटांतून अवैधरीत्या रेतीचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला दररोज कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे.तालुक्यातील लवारी, उमरी या रेतीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यामुळे रात्रीच महसूल विभागाचे नायब तहसीलदार पवार, तलाठी शेखर ठाकरे, हटवार, बिसेन हे दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत तीन ट्रॅक्टरला घाटावर रेतीची तस्करी करताना पकडून तहसील कार्यालयात आणले. दरम्यान, शनिवारी सकाळी पुन्हा अवैध रेती तस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच महसूलचा ताफा रेतीघाटावर पोहोचला. या वेळी दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. मात्र तस्करांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले.  पोलिसांचाही ताफा घटनास्थळावर आला. मात्र पोलिसांसमोर एक ट्रॅक्टर रेतीघाटातून पसार झाला. तरीही पोलिसांनी त्या ट्रॅक्टरला अडविले नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :sandवाळू