शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:06 IST

गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर : प्रशासनाला उशिरा आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले. त्यावरुन जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या किती गंभीर आहे दिसून येते.शहरात मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने पुजारीेटोला धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाल्याने मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध आणि इटियाडोह या चार प्रकल्पाचे पाणी सोडले आहे. यापैकी पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर कालीसरार जलाशयाचे १ गेट उघडण्यात आला असून त्यातून ३८२ क्यूसेक पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे.शिरपूर जलाशयाचे दोन गेट उघडले असून त्यातून ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. शिरपूर व कालीसरार जलाशयाचे पाणी पुजारीटोला जलाशयात सोडून ते कालव्याच्या माध्यमातून सोडले जात आहे. याचा कालव्यालगत असलेल्या गावांना सुध्दा लाभ होणार आहे. इटियाडोह जलाशयाचे पाणी गाढवी नदीत सोडून ते पाणी कालव्याच्या माध्यमातून गावापर्यंत पोहचविले जाणार आहे.हे पाणी सोडल्यामुळे कालव्याच्या किनाऱ्या लगत असलेल्या गावांची भूजल पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निर्देशानुसार इडियाडोह जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.