शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी भूमीगत वितरिकेकरिता चार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:48 IST

बावनथडी प्रकल्पांतर्गत तुमसर - देव्हाडी मार्गावर भूमीगत कालव्याचे कामे सुरु आहे. एक कि.मी. कालव्यावरील चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. शहराजवळ जमिनीचा भाव जास्त असल्याने शासनाने भूमीगत कालवा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रकल्प वितरिकेकरिता जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.

ठळक मुद्देमहाकाय पाईपलाईनचा उपयोग : जमिनीचा बाजारभाव जास्त असल्याने निर्णय

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पांतर्गत तुमसर - देव्हाडी मार्गावर भूमीगत कालव्याचे कामे सुरु आहे. एक कि.मी. कालव्यावरील चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. शहराजवळ जमिनीचा भाव जास्त असल्याने शासनाने भूमीगत कालवा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रकल्प वितरिकेकरिता जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ३५ वर्षे झाली. प्रकल्पाच्या पुर्णत्वाची माहिती देत असली तरी वितरीकेची कामे अपूर्णच आहेत. २३ कोटींचा प्रकल्पाची किंमत ७५० कोटी इतकी झाली. तुमसर शहराजवळून मुख्य वितरिका बोरीकडे जात आहे. तुमसर - देव्हाडी मार्गाजवळ भूमीगत वितरिकेची कामे सुरु आहे. महाकाय पाईप लाईन येथे टाकण्यात आली. एक ते सव्वा कि.मी. लांब पाईप लाईन भूमीगत घालण्यात आली. याकरिता तीन मोठ्या विहिरी समान खोल खड्डा (सिमेंट काँक्रीट) तयार करण्यात आला.तुमसर शहराजवळ शेतीची किंमत जास्त आहे. बाजारभावाने शासन येथे भाव देण्यास असमर्थ आहे. नियमानुसार जमिनीखाली चार फुटानंतर मालकी शासनाची असते. त्याचा आधार घेऊन शासनाने भूमीगत वितरिकेची कामे केली अशी माहिती आहे. संबंधित शेतकºयाचे शेत येथे जेसीबीने खोदून नंतर माती समतल केली. मिनी लिफ्टची कामात त्याचा समावेश होतो. जमिनीखालून पाईप लाईनने पाणी विहिरीसारख्या खड्ड्यात जाईल त्यानंतर पाईपलाईनने ते पुढे नेले जाणार आहे.शासनाने प्रकल्प पूर्णत्वाकरिता पुढील वर्षीची डेडलाईन दिली आहे. त्या अनुषंगाने सर्व कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. बावनथडी प्रकल्पाकरिता शेकडो शेतकºयांनी जमिनी दिल्या त्या शेतकºयांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही. यापुढे शेतकरी प्रकल्पाला विरोध करतील तर भूमीगत कालवा शासन तयार करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.१२ गावांना सिंचनाचा लाभ नाहीगोबरवाही परिसरातील १२ गावे ही उंचावर आहेत. त्यामुळे पाणी पोहचत नाही अशी तांत्रिक अडचण सांगितली जात आहे. तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी लिफ्टची सोय ही एक पर्यायी व्यवस्था आहे. परंतु त्याचा अभ्या ससुरु असल्याचे समजते. १२ गावांकरिता भूमीगत कालवे तयार करता येत नाही काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.तुमसर देव्हाडी मार्गावर भूमीगत वितरिका तयार करण्यात येत आहे. येथील शेती बाजारभावाप्रमाणे खरेदी करणे शासनाला परवडणारे नाही. शासनाने नियमानुसार वितरिकेची कामांना मंजुरी दिली. उर्वरीत शेतकऱ्यांना मोबदला देणे सुरु आहे.-पी.व्ही.वाघमोडे, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसरभूमीगत कालव्याकरिता कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. परंतु जमिनी स्वमर्जीने दिल्या. त्यांना मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. हे न्यायसंगत नाही. गोबरवाही क्षेत्रातील १२ गावांची तांत्रिक अडचण पुढे करण्यात येत आहे. सिंचनापासून गावे वंचित राहता कामा नये.-डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते, तुमसर.