मुस्लिम निकाह कमिटीचा उपक्रम : जोडप्यांना संसारपयोगी साहित्यांचे वाटप, सोहळ्याला सर्वधर्मियांची हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : येथील मुस्लिम निकाह कमिटीच्या वतीने मुस्लिम लायब्ररी कल्चरर सभागृहात मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. मुस्लिम निकाह समितीतर्फे मागील ११ वर्षांपासून विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांना संसारपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. मागीलवर्षी सहा जोडपी विवाहबद्ध झाली होती. यापुर्वी एकदा २१ जोडपी विवाह बंधनात अडकली होती. विवाह सोहळ्याचे अनेक ठिकाणी आयोजन होत असल्यामुळे दिवसेंदिवस विवाह सोहळ्यातील जोडप्यांची संख्या कमी होत आहे. सोहळ्यासाठी समितीचे पदाधिकारी व बांधवांकडून वर्गणी गोळा करून सोहळा आयोजनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येते. विवाह सोहळ्यात मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सोहळ्यासाठी समितीचे अध्यक्ष सैय्यद सोहेल, अरफात खान, फरहान खान, अफसर खान, शकेबउद्दीन खान, अबरारउद्दीन खान, जुनेद अख्तर, ईरशाद खान, रिजवान खान, अनिक जमा, रिजवान काजी, तनवीर खान, साबीर शेख, शादाब पाशा, जुनैद खान, अवेश खान, अमजद खान आणि मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.
सामूहिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: May 12, 2017 01:52 IST