शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वरठीत एकाच रात्री चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:08 IST

कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तीन घरात प्रवेश करण्यात चोरांना यश मिळाले तर चौथ्या ठिकाणी अपयश लाभले. चारही घराचे घरमालक बाहेरगावी असल्यामुळे या घटनेत किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. मुलांना सुटी असल्यामुळे बाहेर गावी जातात. याचा नेमका फायदा घेत चोरांनी कुलूप बंद घरांना लक्ष्य केले. नेहरू वाडार्तील एकाच गल्लीतील चार घरांना फोडण्यात आले. तीन घराचे समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील आलमारी फोडून सामानाची नासधूस केली. आलमारीतील नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. यात सुमन ढवळे , पंकज प्रजापती, व ताराचंद कलंबे यांच्या घरी चोरांनी चोरी केली. दिलीप बावनकुळे यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. पण दरवाज्याला असलेले सेन्टर लॉक तोडता न आल्याने त्यांना घरात शिरता आले नाही. सुमन ढवळे व त्यांचे भाडेकरू यांचे घरातील आलमारीचे कुलूप तोडण्यात आले होते. आलमारीतील साहित्य बाहेर फेकण्यात आले होते. आलमारीचे लॉकर उघडलेले होते. सामाजिक कार्यकर्ते चेतन डांगरे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी पंचनामा केला. यात चोरटे हे सराईत नसावे असा अंदाज व्यक्त केला आहे. घराचे कुलूप सराईत गुन्हेगाराप्रमाणे शिताफीने उघडलेले नव्हते. कुलूप तोडताना लोखंडी साधनांचा वापर करून तोडल्याचे निदर्शनास आले. घरमालकच उपस्थित नसल्याने पोलिसांना तपासात अडचण निर्माण होत आहे.खबरदारी घेण्याचे आवाहनबाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबीयांनी घराची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी केले आहे. सध्या लग्न समारंभाचा हंगाम सुरु असल्यामुळे बाहेर गावी जाणाºयांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडतात. कुटुंबीयांनी घराच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन पोलीस ठाण्यात नोंद करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.