शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:50 IST

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली. ही कारवाई पवनी-अड्याळ मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी ७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आठ बैलांची सुटका केली.

ठळक मुद्देआठ बैलांची सुटका : अड्याळ-पवनी मार्गावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना दोन वाहनांसह अटक करण्यात आली. ही कारवाई पवनी-अड्याळ मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी ७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आठ बैलांची सुटका केली.हेमराज जगन्नाथ नंदूरकर (२८), शिशूपाल मन्साराम मानकर (३६), नीलेश विठोबा वाढवे (२२) तिघेही राहणार नावेझरी ता.तिरोडा जि.गोंदिया आणि सूर्यकिरण वासुदेव उईके (६०) रा.बोरगाव ता.तिरोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अड्याळचे ठाणेदार सुरेश ढोबळे व सहकारी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अड्याळ पवनी मार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना दोन वाहने संशयास्पदरित्या जाताना दिसली. या वाहनांना अडवून तपासणी केली असता प्रत्येक वाहनात चार बैल आढळून आले. परवानगी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेच कागदपत्रे आढळून आले नाही. त्यामुळे या चौघांना अटक करण्यात आली. तसेच महिंद्रा बोलेरो पीकअप वाहनही जप्त करण्यात आले. या जनावरांची अमानवीय पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश ढोबळे, शिपाई मिलिंद बोरकर, सत्यराव हेमणे यांनी केली.