शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर हागणदारीचे चित्र कायमच

By admin | Updated: December 27, 2014 22:46 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ

भंडारा : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्यामुळे गावात शौचालयाची संख्या वाढली आहे; परंतु या शौचालयाचा वापर नगण्य होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात २० टक्यापेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौच्छविधी करीत असल्याने उघड्यावरील हागणदारी कायम असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामूदायिक आणि वैद्यकीय स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर केंद्र शासनाने संपूर्ण देशात निर्मलग्राम योजना सुरू केली. शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत होते. निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती सन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहीत करण्यात आले. २०१२ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रापंचायातींना निर्मलग्राम योजनेचा पुरस्कार मिळाला. तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी काही प्रमाणात कमी झाली होती. सन २०१२-१३ या कालावधीत शौचालयाला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाल्यामुळे लोकांनी शासकीय अनुदान मिळते म्हणून मोठयÞा प्रमाणात शौचालय बांधली. परंतु ग्रामीण भागामध्ये या शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. घरी शौचालय असताना देखील बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्यामुळे जिल्हा तसेच तालुक्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदललेली नाही. (शहर प्रतिनिधी)