शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन विरहित जीवन म्हणजे मानवाचे रुक्ष आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:35 IST

समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल,

ठळक मुद्देनिलय भोगे : वन्यजीव संरक्षण सप्ताह समारोपीय कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल, असे प्रतिपादन भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांनी केले.संताजी कला व विज्ञान महाविद्यालय येथे निसर्ग मंडळ व कोका वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.गिरीश लांजेवार हे होते. तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून चिचाळचे सरपंच मुनेश्वर काटेखाये, रत्नाकर नागलवाडे, सर्प मित्र न्याहारवानी, प्रा. डॉ. रवी पाठेकर, प्रा.डॉ.राजेंद्र खंडाईत, प्रा.रमेश बागडे, प्रा.नितीन थुल, प्रा.गोपाल तलमले, प्रा.अनिल कठाणे, प्रा.आशिष शेंडे, प्रा.गजभिये, जयदेव ढवळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविकेतून प्रा.डॉ.रवी पाठेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा संपूर्ण वृत्तांत स्पष्ट केला. वन व वन्यजीवांचे संरक्षण करून त्यांच्याविषयी आस्था व जिव्हाळा ठेवल्यास मनुष्याचे जीवन सुरक्षित राहू शकेल. मनुष्याला दीर्घ आयुष्य जीवन जगायचे असेल तर वन व वन्यजीवाचे रक्षण करून त्याच्यावर भूतदया दाखवावी तेव्हाच मानवी जीवनाचा सातत्याने उद्धार होईल. वनाची व वन्यजीवाची कत्तल करण्यावर नियंत्रण ठेवून कडक कारवाई केल्यास मानवाचा विकास सातत्याने होईल असे प्रतिपादन मुनेश्वर काटेखाये यांनी व्यक्त केले.सर्पमित्र रत्नाकर नागलवाडे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक विषारी व बिनविषारी सापांच्या जाती व प्रजातीवर प्रकाश टाकला. तसेच सापाविषयी भीती व्यक्तीनी ठेवू नये व सापांना मारू नये. सर्वच सापाच्या जाती विषारी नसतात. म्हणून व्यक्तींनी आपल्या मनातील भीती नाहिशी केली तर अनेक जीवाचा जीव वाचतो असे प्रतिपादन केले.यावेळी प्रा.डॉ.गिरीश लांजेवार यांनी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या उक्तीप्रमाणे वन्यजीवाचा मनुष्याच्या जीवनात व जीवन व्यवहारात फार महत्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या संरक्षणाशिवाय मनुष्य जीवन निरुत्साही ठरते. म्हणून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी वन व वन्यजीवावर व्यक्तींनी प्रेम करायला पाहिजे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.नितीन थुल यांनी केले. तर आभार प्रा.रमेश बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण देव्हारे, संदीप सेलोटे, डेव्हीड कुंभलकर, अंकीता ढोके, दर्शना मदनकर, प्रीती कोडे, सुषमा देशकर, स्नेहा लाडेकर, राजेंद्र पचारे, इंदिरा राऊत, हितेश ठवरे, जया कोडापे यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.