शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘जय’च्या शोधात वनविभागाचा पराजय!

By admin | Updated: September 30, 2016 00:37 IST

उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला

स्पेशल ड्राईव्ह ठरले फार्स : शोधमोहिमेला पावसाचा ब्रेकभंडारा : उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला परंतु ‘जय’च्या कुठल्याही खाणाखुणा आढळून आलेल्या नाहीत. वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २६ सप्टेंबरपासून तीन ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्याचे निर्देश दिले होते. भंडारा वनविभागातील १० ही वनपरिक्षेत्रातील संपूर्ण फौज या ड्राईव्हमध्ये सहभागी झाली होती. यात नाकाडोंगरी, जांब (कांद्री), लेंडेझरी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, अड्याळ आणि भंडारा वनपरिक्षेत्राचा समावेश होता. या दहाही वनपरिक्षेत्रात १० ते १५ चमू तयार करण्यात आले होते. एका चमूत ५ ते ६ जणांचा समावेश करण्यात आला होता. या अभियानातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जय’ ची ओळख व्हावी, यासाठी ‘जय’चे छायाचित्र दिले होते. यात अधिकाऱ्यांपासून तर वनमजूर असा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या चमूकडे जीपीएस मॅपिंग प्रणाली देण्यात आलेली होती. त्यात दररोज किती अंतर फिरले, कोणत्या भागात फिरले, वन्यप्राणी दिसला असेल तिथला अक्षांश व रेखांश घेण्याच्या सूचना होत्या. याचवेळी कोणत्या प्राण्याची विष्ठा सापडली असल्यास आणि झाडावर ओरखडे आढळले असल्यास त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले होते. अड्याळ वनपरिक्षेत्रात १३ चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूत चार जणांचा समावेश असून या चमू रात्रंदिवस जंगलात गस्त करण्यात आली. वनविभागाने प्रथमच एखाद्या वाघासाठी अशाप्रकारचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्यात आला होता. ‘जय’मुळे संपूर्ण वनविभाग अस्वस्थ झाला आहे. यात वन्यजीव विभागातील अनेक अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वनविभागाची ही धडपड केवळ औपचारिकता आहे. ‘जय’ सारखा वाघ चार महिने गप्प बसू शकत नाही. मागील चार महिन्यात एकाही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी वनविभागातील काही अधिकारी दबक्या आवाजात ते मान्य करीत आहेत. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सारवासारव‘जय’ प्रकरणी वनविभागाला टीकेचा सामना करावा लागत आहे. १ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहावर ‘जय’चे सावट राहणार आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाची ही केवळ सारवासारव असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू असून जंगल हिरवेगार झाले आहे. अशा स्थितीत वनअधिकारी आणि कर्मचारी घनदाट जंगलात पायी फिरून खरचं ‘जय’ चा शोध घेणार का, असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जात आहे.