शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अर्धेअधिक घरकुल बांधकामाला वनविभागाची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये  तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी गट क्र. ४४  मध्ये लोकवस्ती असलेली जमीन वगळणे आवश्यक होते. पण, तसे न करता पूर्ण जमीन हस्तांतरित करण्यात आली.

अशोक पारधी लाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील ग्रामपंचायत  धानोरी येथे दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांपैकी अर्धे अधिक लाभार्थी गावातील जमिनीवर वनविभागाचा ताबा असल्याने योजनेपासून वंचित राहणार की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल विभागाच्या ताब्यात असताना आबादी वसुली नंतर ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित झाली. यातून मार्ग काढण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये  तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी गट क्र. ४४  मध्ये लोकवस्ती असलेली जमीन वगळणे आवश्यक होते. पण, तसे न करता पूर्ण जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्या  जमिनीवर  वनविभागाची नोंद असल्याने लाभार्थींना आवास योजनेचे व स्वखर्चाने घर बांधकाम करण्यास अडथळा होत आहे. वनविभागाची मालकी असलेल्या याच जमिनीवर ग्रामपंचायतीचे कार्यालय, सेवा सहकारी संस्थेचे गोडाऊन, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, मच्छी उत्पादक सहकारी संस्था यांच्या इमारती व साधारणतः ५० ते ५५ नागरिकांची घरे बांधलेली आहेत. मात्र, २०२०-२१ यावर्षी पासून मंजूर झालेले प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल व स्वखर्चाने बांधकाम करू इच्छित असलेल्या नागरिकांना घर बांधकामात वनविभाग आडकाठी टाकत आहे. कित्येक लाभार्थी झोपडीत राहत असल्याने यावर्षी त्यांच्या उपवर मुलं - मुलींचे लग्न होऊ शकले नाही. काही लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट असल्याने यावर्षी पावसाळ्यात त्यांनी कुठे आसरा शोधावा हा प्रश्न त्यांचे पुढे आवासून उभा आहे. जमिनीची अडचण दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदन दिले आहे. मात्र, काहीही झाले नाही. दुसरीकडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 

अत्यंत गरीब व गरजू लाभार्थींपैकी काहींनी घर बांधायला सुरुवात केली. अर्धवट काम झाले व बांधकाम थांबविण्यात आले. त्यामुळे दुसऱ्यांचे आडोशाला लहान मुलांना सोबत घेऊन  कसेबसे राहावे लागत आहे. पावसाळ्यात अशा स्थितीत राहणे म्हणजे जीविताला धोका आहे. सर्व विभागप्रमुखांनी समन्वय साधून अडचणी दूर कराव्यात. - गीता मंडपे,सरपंच, धानोरी.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाforest departmentवनविभाग