शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

जंगलात वणवा अन् अधिकाऱ्यांची वानवा!

By admin | Updated: March 22, 2017 00:29 IST

तुमसर तालुक्यातील लेंडेझरीसह तुमसर वनपरिक्षेत्रात वनवणवे (आग) मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

लेंडेझरी येथे जंगलात आगीचे सत्र : पाणवठ्यांना मंजुरीची प्रतीक्षा, नैसर्गिक पाणवठ्यांवर वन्यप्राणी निर्भरमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील लेंडेझरीसह तुमसर वनपरिक्षेत्रात वनवणवे (आग) मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यापासून जंगलाचे अस्तित्व धोक्यात असून वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. कर्तव्य जंगलात वास्तव शहरात सुरु असल्याने जंगल, वन्यप्राणी कसे सुरक्षित राहणार हा मुख्य प्रश्न आहे. पाणवठ्यांना येथे मंजूरी मिळाली नाही. केवळ नैसर्गिक पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तृष्णा भागणार काय? हा संशोधनाचा विषय आहे.तुमसर तालुक्यात तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी तीन वनपरिक्षेत्र आहे. सुमारे ४५ कि.मी. परिसरात हे जंगल आहे. लेंडेझरी जंगल राखीव व संरक्षित क्षेत्रात येते. लेंडेझरी जंगलात ठिकठिकाणी सध्या वणवे सुरु आहेत. अक्षरश: जंगल जळत असल्याचे चित्र आहे. मोठे झाडे येथे आहेत. तेंदूपत्ता संकलन करणारे आगी लावतात असे कारण पुढे केले जाते. याकरिता वनविभागाचे फिरते पथक निश्चितच आहे. हे पथक नेमके करते काय? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्य शासनाने एक वाहन दिले आहे. हे वाहन दररोज तुमसर शहरात फिरताना सर्रास दिसते. अधिकाऱ्यांच्या दिमतीला ही वाहन आहे काय? असा प्रश्न येथे पडला आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रानंतर पलिकडे नागपूर जिल्ह्याच्या व मध्यप्रदेशाच्या सीमा सुरु होतात. उन्हाळ्यात नेमके शिकारी टोळी येथे सक्रीय होतात. रस्त्याच्या शेजारीच येथे जंगलात आग लागल्याच्या घटन ेत वाढ होत आहे. उन्हाळ्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २४ तास लक्ष ठेवून मुख्यालयी राहण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु येथे त्याचा प्रभाव पडला नाही असे दिसून येते. नुकतीच जंगलात व वास्तव्य शहरात अशी स्थिती आहे. परंतु वरिष्ठ अधिकारीही येथे लक्ष देत नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मुख्यालयी सदनिका नाहीत. कर्मचाऱ्यांनी राहावे कुठे असा प्रश्न निश्चितच आहे. पाणवठे नाहीतवन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता नैसर्गिक तथा कृत्रिम पाणवठे असले पाहिजे. तुमसर तालुक्यात नैसर्गिक पाणवठे असल्याचे दाखवून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाही. तुमसर वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठे एक ही नाही. नाकाडोंगरी येथे दोन कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मंजूरी नुकतीच मिळाली आहे. तर लेंडेझरी येथेही कृत्रिम पाणवठे नाहीत. अशी माहिती आहे. लेंडेझरी येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.पाणवठे तयार करण्याकरिता निधी प्राप्त झाला नाही. प्रस्ताव सादर केला आहे. नाला पुनर्जीवनाची कामे केली आहेत. पाणवठे तयार करण्याकरिता मंजुरी मिळाली नाही.-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसरनाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दोन कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मंजुरी प्राप्त झाली आहे. कारली व पवनारखारी येथे तयार होणार आहेत.-एम.एन. माकडे, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.