शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

रोहयोच्या कामात ‘आधार’ची सक्ती

By admin | Updated: April 6, 2015 00:45 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

शासन निर्णय : १२० दिवस काम उपलब्ध करुन देण्याचा नियममोहन भोयर तुमसरमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेकांजवळ आधार कार्ड नाही या मजुरांची मजुरी केवळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक तथा स्थानिक पोस्ट आॅफिसमध्ये खाते उघडण्यास शासनानेच बंद घातली आहे. मजुरांना याकरिता शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. १२० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचे नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन दिलेच पाहिजे असा कायदा आहे. आदिवासी बहुल गावात १५० दिवस कामे दिली पाहिजे. १ एप्रिलपासून या मजुरांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड नसेल तर मस्टर तयार होणार नाही. याची धास्ती मजूरांनी घेतली आहे. यापूर्वी तालुक्यात शासनाकडून आधार कार्ड तयार करण्याकरिता गावात संबंधित एजेन्सी पाठविली होती. त्यांनी आधार कार्ड काढले, परंतु अनेक मजुरांना आधार कार्ड प्राप्त झाले नाही. त्या एजेन्सीकडे संपर्क साधल्यावर आधार कार्डची स्लिप घेऊन या असे सांगण्यात येत आहे. स्लिप नसेल तर नविन आधार कार्ड काढा असे सांगण्यात येते. मजूरांना यामुळे शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.रोजगार हमी कामाची मजूरी मजुरांच्या खात्यात जमा होते हे खाते राष्ट्रीयकृत बँकत असणे गरजेचे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा मोठ्या गावात आहे. पोस्ट आॅफिसच्या शाखा गावात आहेत. याचे खाते आता पुढे चालणार नाही असा आदेश मजूरांना देण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खात्याकरिता परिसरातील मोठे गाव तथा शहराशिवाय पर्याय नाही. तिथेही कटकट आहे.तुमसर तालुक्यात ३ हजार ४०८ कुटुंबांना १०० दिवस कामे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. ३ लाख ७१ हजार २०३ मनुष्य दिवस कामांची योजना ठरविण्यात आली. १९ हजार ९१९ कुटुंबांनी कामाची मागणी केली होती. त्यापैकी १७ हजार ११ हजार कुटुंबांना कामे उपलब्ध करुन देण्यात आली. एकूण ९ लाख ४१ हजार ४०२ मनुष्य दिवस कामे पुरविण्यात आली. आधार कार्ड व खात्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांना विचारणा केली असता मी एका बैठकीत आहे नंतर माहिती देतो असे सांगितले.रोजगार हमीची कामे आॅनलाईन झाली असून मजुरांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याचा नियम शासनाकडून झाला आहे. स्थानिक बँक तथा पोस्ट आॅफिस आॅनलाईन नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. - पी. बी. मोरे, कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी, तुमसर