शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विदेशी दारु कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:32 IST

नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे.

ठळक मुद्देउर्सरागोंदी येथे धाड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, नामवंत कंपन्यांची नक्कल झाली उघड
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे.लोकेश वासुदेव निंबार्ते (२८) रा. उर्सरागोंदी असे बनावट दारु निर्मिती करणा-याचे नाव आहे. सणांच्या निमित्ताने भंडारा तालुक्यातील उर्सरागोंदी परिसरात अनेक दिवसांपासून बनावट दारु निर्मिती होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार रविवारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी धाड मारली.यावेळी विक्रीसाठी तयार केलेल्या मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीला असलेल्या सिल्व्हर झेड विस्की तसेच त्यापासून महाराष्टÑातील नामांकित ब्रॉण्डच्या विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल असा एक लाख १४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी लोकेश निंबार्ते याला अटक करण्यात आली. त्याच्या विरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा शर्मा, भंडाराचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी कदम, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, संजय कोवे, विनय हरिणखेडे, मंगेश ढेंगे, सविता गिरीपुंजे यांनी पार पाडले.जिल्ह्यात बनावट दारुचा शिरकावगावठी दारु पाठोपाठ आता जिल्ह्यात बनावट दारुनेही शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. नामवंत कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करुन ही दारु विकली जाते. दिसायला हुबेहुब असल्याने अट्टल दारु पिणाऱ्यांनाही ही बाब लक्षात येत नाही. परंतु या बनावट दारुमधील विषारी घटकांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही एक कारवाई केली असली तरी जिल्ह्यात असे अनेक कारखाने असण्याची शक्यता आहे.