शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा योजनेतून गरजूंना अन्नधान्य

By admin | Updated: June 26, 2017 00:29 IST

शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली.

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : देऊळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली. वंचित राहिलेल्या अत्यंत गरजवंताना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन नव्याने पाच हजार कार्ड तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिली, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथे ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पण, स्मशानभूमीचे भूमीपूजन व वनव्यवस्थापन समितीद्वारे महिला गॅस कनेक्शनचे वाटप अशा विविधांगी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्य चंदु पिल्लारे, पंचायत समिती सदस्य जगदीश उके, प्रमेश नलगोपुलवार, तालुका युवा मार्चाचे अध्यक्ष अंकुश समरीत, श्रीकृष्ण जावळकर, सरपंचा प्रिया राहुल, उपसरपंच किशारे मोहनकर, युवा नेते रक्षीत उचिबगले, वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले, क्षेत्रसहाय्यक बावनथळे, वनरक्षक मोहन गटारे, अनिल झंझाड, हाके, सेवक पिल्लारे, माजी सरपंच अंबादास उचिबगले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मेश्राम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार वाघमारे म्हणाले, पुर्वी शासन व्यवस्थेत अनियमितता असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वंचीत राहावे लागत होते. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर गरजवंताना त्यांचा फायदा होणार आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातुन शासनाने गरजवंताच्या दारापर्यंत अन्न धान्य पोहचविण्याचे प्रभावी कार्य केल्यामुळेच आज कुणीही उपाशी राहणार नाही. याची काळजी शासनाने घेतली आहे. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन करण्यात आले. यानंतर रोहयो अंतर्गंत येथील स्मशानभूमी भूमीपूजन व आमदार चरण वाघमारे यांच्या स्थानिक निधी अंतर्गंत बांधलेल्या ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पन व महिलांना गॅस कनेक्सनचे वितरण आ. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. इंधनासाठी महीलांनी वृक्षतोड न करता गॅसचा नियमित वापर करुन कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कांद्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले यांनी केले. संचालन उपसरपंच किशोर मोहनकर यांनी तर, आभार रक्षीत उचीबगले यांनी मानले.