कुठे अन्नाकरिता संघर्ष : तर कुठे अन्न फेकले जाते उकिरड्यावर भंडारा : लग्न सोहळा असो वा कोणता कार्यक्रम यात जेवणावळी आल्याच. आज मात्र या जेवणावळीचे स्वरु प बदलत आहे. आता पंगतीती पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेने घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही; मात्र यातून गैरसमजामुळे निर्माण होत असलेल्या प्रकारामुळे अन्नाचा अपमान होत आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे अन्न पूर्णब्रह्म चा विसर पडत आहे. कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या मागे वा जागा असेल तिथे अन्नाचे ढिग लावल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. एका लग्न प्रसंगात सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील बरेचसे अन्न वाया जाते. एक प्रसंगात किमान 150 लोकांचे अन्न वाया जाते.उकिरड्यावर हे अन्न फेकून याची विल्हेवाट लावली जाते. उकिरड्यावर फेकलेले अन्न सडल्यामुळे त्यातून मिथेन या घातक वायुची निर्मिती होते. ग्लोबल वार्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडी एका प्रकारे कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असे म्हणणाऱ्या भारत देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे. अशातही होणारी अन्नाची नासाडी ही त्याचा विपर्यास दर्शविणारी आहे. ताटातील उष्टे अन्न उकीरड्यावर टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अन्न उष्टे न टाकता योग्य वापर केल्यास अन्नपूर्णादेवीचा सन्मान होतो हे समजणे गरजेचे आहे. गरीब व्यक्ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. त्याच देशात कोटीवधी रु पयांचे अन्न फेकून दिले जाते, ही खरं तर शरमेची बाब आहे. एका जेवणात १ हजार २३९ कैलरीज असतात जी कुपोषित बालकांच्या दिवसभराच्या ऊर्जेची गरज भागवू शकतात. मात्र लग्नातील प्रत्येक ताटातील २० टक्के जेवण म्हणजे २४६ कॅलरीज अन्न फेकून दिल्या जात आहे. अन्नाला देव म्हणविणाऱ्या भारतातच हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असणे ही एक शोकांतीकाच ठरत आहे. (प्रतिनिधी) भूक नसो पण ताटात असो वृत्तीमुळे अन्नाची नासाडीलग्न समारंभ असो वा कोणताही कार्यक्र म त्यात जेवणावळी आल्याच. यात सध्या बुफे पद्धत जोर धरत आहे. समारंभात गर्दी असल्याने येथे येणारे नागरिक पुन्हा रांगेत लागण्याच्या भानगडीत न पडता एकाच वेळी पूर्ण प्लेट भरून घेतात. यात आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न घेतल्या गेल्याने ते त्यांच्या खाण्यात जात नाही. पर्यायी ते अन्न प्लेटमध्ये तसेच टाकण्यात येते. येथूनच अन्नाची नासाडी सुरू होते. जर आवश्यकतेनुसार अन्न घेतले तर ते वाया जाणार नाही याची काळजी सर्वसामान्य नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
अन्न हे पूर्णब्रह्मचा विसर
By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST