शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषधी प्रशासनाने घेतली दुकानांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:45 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, जर्दा तंबाखू व अन्य पदार्थ उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असताना देखील लाखांदूर तालुक्यात राजरोस गुटखा व तंबाखू विक्री सुरू आहे. चौकाचौकात चहावाले, पान टपरीमध्ये खुलेआम गुटखा मिळतो. मात्र याकडे अन्न औषध विभाग व पोलीस प्रशासनाचा ढिम्मपणा कारणीभूत असल्याची बाबही उघडकीस आली. लाखांदुरातील काही व्यावसायीकांकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा वाहतूक व विक्री जोमात चालू असल्याचे बुधवारला 'लोकमत'मध्ये प्रकाशीत करण्यात आले होते.

ठळक मुद्देलोकमतचा दणका : व्यावसायिकांनी केला तंबाखू व गुटखा लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, जर्दा तंबाखू व अन्य पदार्थ उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असताना देखील लाखांदूर तालुक्यात राजरोस गुटखा व तंबाखू विक्री सुरू आहे. चौकाचौकात चहावाले, पान टपरीमध्ये खुलेआम गुटखा मिळतो. मात्र याकडे अन्न औषध विभाग व पोलीस प्रशासनाचा ढिम्मपणा कारणीभूत असल्याची बाबही उघडकीस आली. लाखांदुरातील काही व्यावसायीकांकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा वाहतूक व विक्री जोमात चालू असल्याचे बुधवारला 'लोकमत'मध्ये प्रकाशीत करण्यात आले होते.प्रकाशीत झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा अन्न व औषध विभाग भंडाराच्या अधिकाऱ्यांनी लाखांदुरातील दुकानांची झडती घेतली आहे. 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच सर्व व्यावसायिकांनी दुकान व गोडाऊन मध्ये लपवलेला तंबाखू व गुटखा लंपास करून दुसरीकडे हलवला असल्याने जिल्हा अन्न व औषध विभागाच्या हाती काहीच लागू शकले नाही.लाखांदुरातील उपहारगृह व पान टपºयांवर मोठ्या प्रमाणात खर्रा व गुटखा विक्री होत असून हाटेल व पान टपरी व एका किराणा दुकान चालकाने दिलेल्या माहितीनुसार लाखांदुरातील व्यावसायिकांकडे तंबाखू व गुटख्याचा खुप मोठा साठा असल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान बुधवारला 'लोकमत' मध्ये वृत्त प्रकाशित होताच अन्न व औषध विभाग भंडाराचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. देशपांडे, पि.व्ही. मांडवटकर, सहाय्यक आयुक्त ना.रा. सरकटे, सहाय्यक एन.डी. बारसागडे यांनी लाखांदुरातील अमर किराणा, मोहन किराणा, एकता कन्फेक्शनरी, वसनशाह किराणा, माँ शक्ती ट्रेडर्स व अन्य पाच गोडाऊनची झडती घेतली आहे. यावेळी पोलीस हवालदार राजेश शेंडे, उदाराम ठाकरे सोबत होते. कारवाईची प्रक्रीया अशीच सुरळीत ठेवावी, असा सूर कारवाईदरम्यान बघ्योची होती.