शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यान्नातील भेसळ आरोग्यासाठी हानीकारक

By admin | Updated: April 28, 2016 00:29 IST

सध्या लगीन घाई सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते.

अन्न-प्रशासनाची डोळेझाक : तेलातून होतेय भेसळभंडारा : सध्या लगीन घाई सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते. या दिवसांत भेसळीला उधाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून अन्न भेसळ विभागाचे अधिकारीसुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाहारगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असला तरी याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू असून अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे. काहींनी आता गोठणारे पामोलीयन तेल तूर्तास भेसळ करणे थांबविल्याचे सुध्दा सांगितले जाते. तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, एवढेच नव्हेतर गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ सुरू आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीकरिता दिसायला लागला आहे. भेसळ करणारे कोट्यधीश झाले तर गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र अन्न , भेसळ विभागाचे अधिकारीच मूग गिळून बसले आहे. एखाद्या दुकानात धाड टाकलीच तर शुध्द आणि नामांकित कंपनीच्या पुड्यातील तेल किंवा अन्नपदार्थ नमुनादाखल घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले जात आहे. यामळे हे नमुने कधी बदलले याबाबत ग्राहकांच्या लक्षात येतच नाही. केवळ खिसेभरू धोरण असल्याने गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे गरिबांच्या पैशातून वेतन घेणाऱ्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कोण आवळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या अन्नभेसळीमुळे आजाराला आमंत्रण द्यावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)उपहारगृहात नियमांना तिलांजलीशहरासह जिल्ह्यातील उपहारगृहामध्ये हजारो ग्राहक नास्ता, जेवण घेतात. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कामावरील मानसांचे आरोग्य तपासणी केल्या जात नाही. तर नियमांना तिलांजली देऊन उपाहारगृहाचे सर्रास व्यवसाय सुरुआहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष आहे. अन्न भेसळीकडे लक्ष देणार काय ? जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन ग्राहकांची लूट होत असताना उघड्या डोळयांनी पाहणारे अधिकारी याकडे लक्ष देतील की, वेळ मारुन नेईल, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ गरिबांच्या माथी मारून अनेकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. वारंवार चर्चा असतांना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचेही आता सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जाऊ लागले आहे.