शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करून चोरीचा टिप्पर पकडला

By admin | Updated: December 25, 2015 01:33 IST

तिरोडा गुमाधावडा येथील एक टिप्पर अज्ञात चोरटे तुमसरमार्गे पळवून नेत असल्याची माहिती भंडारा पोलिसांकडून तुमसर पोलिसांना मध्यरात्री मिळाली.

पोलीस बचावले : बॅरिकेटस तोडून पळाला आरोपीतुमसर : तिरोडा गुमाधावडा येथील एक टिप्पर अज्ञात चोरटे तुमसरमार्गे पळवून नेत असल्याची माहिती भंडारा पोलिसांकडून तुमसर पोलिसांना मध्यरात्री मिळाली. तुमसर पोलिसांनी तातडीने खापा चौकात बॅरिकेटस लावून मार्ग बंद करीत होते. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकचालकाने बॅरिकेट तोडून ट्रक सुसाट वेगाने पुढे गेला. त्यानंतर तुमसर पोलिसांनी या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करुन रामटेक मार्गावरील कांद्री शेतशिवारात पकडण्यात यश मिळविले. ही घटना मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.अशफाक युसुफ खान (३०) रा.कामगारनगर कामठी जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तिरोडा येथील अदानी पावरप्लँट गुमाधावडा गावाशेजारी रस्त्याच्या कडेला असलेला टिप्पर क्र. डब्ल्यू बी. ३७ बी.५००९ या ट्रकमध्ये कुणीही नसल्याचे पाहून आरोपीने टिप्पर पळवून नेला. याची माहिती होताच टिप्पर चालकाने तिरोडा पोलिसांशी संपर्क साधला. तिरोडा पोलिसांनी भंडारा कंट्रोल रुमला माहिती दिली. तिथून तुमसर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान गस्तीवर असलेले तुमसरचे पोलीस हवालदार ओमकार श्रीवास, नितीन साकुरे, दिलीप धावडे, आक्रोज बडोले, चालक शरणागत यांनी ट्रक पकडण्यासाठी खापा चौरस्त्यावर बॅरिकेटस लावले. तितक्यात चोरी झालेला टिप्पर विरुध्द दिशेने येत असताना ओमकार श्रीवास यांना दिसताच थांबविण्याचे निर्देश दिले. परंतु आरोपीने बॅरिकेट तोडत रामटेकमार्गे पळ काढला. तुमसर पोलिसांनी वाहनाने पाठलाग करुन रामटेक मार्गावरील कांद्री शेतशिवारात पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला तुमसर पोलीस ठाण्यात आणून त्याची कोठडीत रवानगी केली. (शहर प्रतिनिधी)