शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

समाजजागृतीचे माध्यम ठरली लोककला ‘दंडार’

By admin | Updated: December 10, 2015 00:49 IST

पौराणीक काळात दंडार, नकला, संगीत नाटक व पोवाळा हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. आधुनिकतेमुळे यांत्रिक युगात हे साधने कालबाह्य होत असले तरी,

नितेश किरणापुरे लवारीपौराणीक काळात दंडार, नकला, संगीत नाटक व पोवाळा हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. आधुनिकतेमुळे यांत्रिक युगात हे साधने कालबाह्य होत असले तरी, साकोली तालुक्यातील लवारी येथील एका मंडळाने मागील १५ वर्षांपासून 'दंडार'च्या माध्यमातून समाज जागृती करण्याची परंपरा आजही जोपासली आहे.लवारी येथील काही धेय्यवेडे युवक एकत्र आलेत. समाजात घडत असलेली अंधश्रध्दा, मागासलेपणा व अशिक्षितपणाचा फटका यामुळे दैनिक जीवनात त्यांच्यावर येत असलेले संकट. यामुळे ते विचलीत होवून त्यांनी एका मंडळाची स्थापना केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नवनीत दंडार मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अखंडीतपणे समाज जागृतीचे काम सुरू ठेवले आहे. या मंडळात गावातील सर्व समाजातील युवकांचा सहभाग आहे. मात्र, त्यांनी ज्या काळात दंडारीच्या माध्यमातून समाज जागृतीचा संकल्प केला. त्यावेळेस या युवकांना गावातील काहींनी हास्यात काढले. मात्र, न डगमगता या युवकांनी समाज जागृतीचा संकल्पाला तडा जावू न देता दंडारींचा प्रयोग अविरत सुरूच ठेवला. युवकांच्या अंगात असलेल्या कलागुणांना त्यांनी दंडारीतून मोठा रंगमंच मिळवून दिला होता. रात्री उशिरा सुरू होत असलेला हा दंडारीचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर अखंडीत सुरू राहत असे. महत्त्वाचे म्हणजे, दंडीर हे मंडईच्या कार्यक्रमात ऐन कुडकुडत्या हिवाळ्यात ठेवण्यात येतात. यामुळे सहभागी कलावंत थंडीची तमा न बाळगता वेळप्रसंगी पात्रानुसार रात्री अर्धनग्नावस्थेत पात्रातून अभिनय साकारतात.काही सधन तर काही मध्यम कुटुुंबातील हे युवक त्यांच्या घरातील सर्व कामे हातावेगळी झाल्यावर मिळालेल्या फावल्या वेळेत दंडारीतून त्यांच्या अंगातील कलागुण दाखवित आहेत. कालांतराने या मंडळाकडे ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मागील पाच वर्षापासून शासकीय लोकजागृतीचे काम त्यांच्या मंडळाकडे चालून येत आहेत. स्वच्छ भारत मिशन, स्त्रीभृ्रणहत्या, अंधश्रध्दा, हुंडाप्रथा, बालविवाह अशा एक ना विविध प्रकारावर आधारित नाटीका हे कलावंत दंडारीतून साकारीत आहेत. त्यांच्या या मोहिमेला समाजातील घटकही चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ हौस म्हणून स्थापन केलेल्या मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेली युवकांची ही दंडार पंचक्रोशित नावारूपास आली आहे. त्यांचे दंडारीचे प्रयोग बघताना, पौराणीक काळातील कला जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी चालविलेला खटाटोप खरोखरचं वाखाणण्याजोगा आहे.