शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

मुलांना प्रेरीत करण्यावर भर द्या

By admin | Updated: January 25, 2017 00:42 IST

विद्यार्थी दशेत मुलांवर प्रचंड ताण असतो. शाळा, घर यासोबतच शिकवणीवर्गाचा भारही त्यांना सतावत असतो.

विनिता साहू यांचे प्रतिपादन : सेंट मेरीस शाळेचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलनभंडारा : विद्यार्थी दशेत मुलांवर प्रचंड ताण असतो. शाळा, घर यासोबतच शिकवणीवर्गाचा भारही त्यांना सतावत असतो. अशावेळी त्यांच्यावर दबाव न देता त्यांना प्रेरीत करा. विद्यार्थ्यांना आवडेल त्या दिशेत त्यांना जावू द्या. आवडत्या क्षेत्रात ते नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.खात रोड स्थित सेंट मेरीस शाळेच्या दहाव्या वार्षिक स्रेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालन बेबी थॉमस, प्राचार्य नरगिस काझी, सचिव बेटशी शिजो उपस्थित होते. दिप प्रज्वलन करुन तथा विद्यार्थ्यांच्या अप्रतिम स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बेटशी शिजो यांनी उपस्थित पाहूण्यांचा अल्प परिचय करुन दिला. प्रास्ताविक तथा अहवालातून प्राचार्य काझी यांनी शाळेची गौरवशाली परंपरा, विद्यार्थ्यांचे सुयशाबाबद मार्गदर्शन केले. विनिता साहू म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच खरे मार्गदर्शक शिक्षकांच्या रुपातून मिळत असते. ज्वॉय आॅफ गिव्हींग च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्याला काहीतरी देण्याची भावना निर्माण होते. थेंबाथेंबातून जसा समृद्र निर्माण होते. तशीच भावनाही मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी ग्रामीण क्षेत्रातून आलेली मुलही आॅल्मपीयाड मध्ये झेप घेतात. ही खरच वाखणण्याजोगी बाब आहे. बेबी थॉमस यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याना तसेच पालकांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. व्यंजन बनविण्याच्या स्पर्धेत रामा गजभिये, विजया कावळे, रांगोळी स्पर्धेत शुभांगी भिवगडे व कांचन भादुरी, आॅल्म्पीयाड स्पर्धेतील सिध्दी पडोळे, प्रणय धुर्वे, आदीत्य सेलोकर, प्रतिक्षा धुर्वे, अनुराग कटकवार, मधुरा कावळे, समृध्दी इंगोले या विद्यार्थ्यांनी तर पालकांमधून क्रिकेट स्पर्धेतील विलास बिलवणे, हाके, कैलाश फुलझेले, राठोड, पंकज बडवाईक, सुरेश घोडे, जय आकरे, सतगुरु पाचे, मोहम्मद अली, सुनिल चव्हाण, राजेश तरोणे, रमेश सिंगणजुडे यांना सन्मानित करण्यात आले. संगीत शिक्षिका रेखा पटले यांचे गायन सर्वांना मोहित करून गेले.संचालन याना मसी व दिपा प्रधान यांनी केले. आभार प्रदर्शन शुभांगी पडोळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी समृह नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. त्यांच्या नृत्याने उपस्थित पालकांनाही जागेवरच खिळवून ठेवले. (प्रतिनिधी)