शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल भरावातील फ्लायअ‍ॅशला पाण्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही.

ठळक मुद्देदेव्हाडी येथील उड्डाणपूल : संथगतीमुळे प्रवाशांना फटका, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअ‍ॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. येथे कंत्राटदार व संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे.देव्हाडी येथे तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर उड्डानपुलाचे काम मागील चार वर्षापासून संथगतीने सुरु आहे. गोंदिया व तुमसर मार्गावर अ‍ॅप्रोच रस्ता तयार केला जात आहे. येथे अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅशचा वापर भरावाकरिता केला जात आहे. पीठासारखी अ‍ॅश ट्रकमधून सरावाकरिता घालतांना मोठा धुराळा उडतो. रेल्वे फाटकाजवळ शेवटचा भराव करतांना कंत्राटदाराने पाण्याचा मुलामा देण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे. फाटकाशेजारी दूचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. फ्लाय अ‍ॅशचा धूराळा उडू नये म्हणून तात्काळ पाणी मारण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी पाणी मारले जात नाही. येथील दोन्ही बाजूच्या पर्यायी रस्त्यावर फ्लाय अ‍ॅशचा थर अजूनही पडून आहे. कंत्राटदाराचे येथे मागील अनेक महिन्यापासून दुर्लक्ष होत आहे.उड्डाणपूलाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे येथे नियमित अधिकारी येत नाही. परिणामी कंत्राटदाराचे फावत आहे. भेटीकरिता व निरीक्षणाकरीता वरिष्ठ अधिकारी येतात व निघून जातात. पर्यायी पोचमार्ग व इतर सुविधा पूरविण्याचा, खड्डे बुजविण्याचे, रस्त्याची देखभाल करण्याचे नियम आहे, परंतु येथे नियमाकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. पर्यायी रस्ता अक्षरश: खड्डेमय झाला आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य येथे दाखविण्यात येत नाही. यासंदर्भात जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा या उड्डाणपूलाशी संबंध नाही, नागपूर येथील मुख्यालयातून नियंत्रण सुरु आहे.सुमारे २४ कोटी रुपये किंमतीचा उड्डाणपूल असून जबाबदार अधिकाऱ्यांची येथे वाणवा दिसत आहे. प्रवाशांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पर्यायी रस्ता ही अरुंद असल्याने व राखेचा धुरामुळे रस्ता दिसत नसल्याने वाहने अंदाजानेच पुढे न्यावे लागते.जिल्हाधिकाऱ्यांनी येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे. पर्यावरणाला धोक्यासोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. संथगतीने कामामुळे येथे डोकेदुखी वाढली आहे. रहदारी वाढल्यानेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आले होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीroad transportरस्ते वाहतूक