शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी पैशाचा महापूर

By admin | Updated: June 20, 2016 00:24 IST

उकाड्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही.

तहान झाली महाग : बाटलीबंद पाण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, घरोघरी पोहोचविले जात आहे बाटलीबंद पाणीलाखांदूर : उकाड्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही. यासाठी मनसोक्त पैशाची उधळण केली जाते. बाटलीबंद पाण्याची मागणी सर्वाधिक आहे. परंतु बाटली कोणत्या कंपनीची आहे याकडे दुर्लक्ष केल्या जाते. ‘चिल्ड’ हा शब्द आवर्जून तहानलेल्यांच्या तोंडात घर करून बसला असल्याने दुकानदारही मान्यता नसलेल्या किंवा जास्त कमीशन मिळेल त्या बाटल्यांचा गोरखधंदा बिनधास्तपणे करीत आहेत.लाखांदूर तालुक्यासह साकोली, सानगडी, वडसा, पवनी या ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर जोमात होतो. दररोज तालुक्यात २,५०० हजार बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती एका उद्योजकाने दिली. यासाठी एका दिवसाकाठी ५० हजार रुपये पाण्यासाठी खर्च होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने दररोज पिण्याचे पाणी नाकारून नागरिक रिस्क घेण्यापेक्षा बाटलीबंद शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरण्याला प्राधान्य देतात. मात्र सर्वांनाच पाणी विकत घेऊन पिण्यासाठी परवडत नाही. शासकीय यंत्रणेत पिण्याच्या पाण्यासाठी पैशाची तरतूद नसली तरीही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर बॉटल असतात. कपाटात बॉक्स असतात. कोणतीही बैठक असो. मेळावा असो किंवा कार्यशाळा असो. यासाठी हजारो रुपये पाण्याच्या बाटलीसाठी राखीव ठेवलेले असतात. कधी यातीलच बाटल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी पोहचत्या गेल्या जातात. एका दिवसात लाखांदूर तालुक्यात २,५०० बाटल्या विकल्या जातात. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च, महिन्याकाठी १५ लाख रुपये तर वर्षाला जवळपास १ कोटी ८० लक्ष रुपये निव्वळ बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी खर्च होतो. बसस्टँड, हॉटेल्स, बियर बार, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालय, कार्यक्रम, दवाखाने, पार्ट्या आदी ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोणत्याही शासकीय यंत्रणेचा आपल्या पाणी पुरवठ्यावर विश्वास नाही. पूर्वी कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर किंवा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र असायचे. आता प्रत्येक कार्यक्रमात आणि टेबलवर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. शुद्ध पाण्याची गरज फक्त अधिकारी किंवा श्रीमंत वर्गालाच आहे काय? बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. त्यांना शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? नागरिकांना पुरवत असलेले पाणी इतके अशुद्ध आहे काय? याची उत्तरे ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे. बाटलीबंद पाणी पिल्यानंतर रिकाम्या बाटल्यांच्या प्रदुषणाला प्रश्न भविष्यात गंभीर परिणाम सामान्य नागरिकास भोगावयास नक्कीच भाग पाडणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)१५ प्रकारचे ब्रॅन्डलाखांदूर तालुक्यात किमान १५ ब्रॅन्डचे पाणी विकले जाते. अनेक उद्योग समूह बाटलीबंद पाणी निर्माण करीत आहेत. त्यावर संबंधित विभागाचे कसलेच निर्बंध नाही अन्न व औषधी प्रशासनाला पाण्च्याचा संबंध अन्नाशी आहे याचे पलीकडे दुसरी माहिती नाही. या पाण्याच्या अधुनमधून तपासण्या करणे आवश्यक आहे.