शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बावणथडीला पूर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 8, 2025 13:36 IST

Bhandara : सुरक्षेच्या कारणावरून बपेरा सीमेत पोलिसांनी वाहतूक थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बावणथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतर राज्य पुलावरून आज मंगळवारी सकाळपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरून वाहतूक धोकादायक असल्याच्या कारणावरून सिहोरा पोलिसांनी बपेरा गावाच्या सीमेत वाहने रोखली आहेत. बावणथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 

सिहोरा परिसरातून गेलेल्या भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गला बावणथडी नदीवरील पूल महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडतो. नदीवर रॉप्टर पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेकदा पूल बुडतो.  दोन दिवसापासून दमदार पावसामुळे बावणथडी नदीला पूर आला आहे. 

आज मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बावणथडी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पुराचे पाणी वाहून जाण्यास फक्त १ फूट अंतर शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाला सूचित करून पोलिस निरीक्षक विजय कसोधन व सहकाऱ्यांनी आंतर राज्य पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बपेरा गावाच्या सीमेत वाहने रोखून धरण्यात आली आहेत. यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

बपेरातील गावकरी अलर्टवैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना बावणथडी नदीच्या पुराला थोप दिली आहे. हे पुराचे पाणी गावात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. बपेरा गावातील नागरिक अलर्ट झाले आहेत. महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा पूरग्रस्त गावांना भेट देऊन लक्ष ठेऊन आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश पोलिस सतर्क सकाळी ११ वाजतानंतर पुराच्या पाण्यात वाढ सुरू झाल्याने पलिकडे मध्यप्रदेशातील पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. बपेरा, महाराष्ट्र आणि मोवाड, मध्यप्रदेश या दोन्ही सीमेवर पोलीस नियुक्त करण्यात आले आहे. दोन्ही राज्याचे पोलीस प्रशासन आंतर राज्य वाहतुकीवर नियंत्रण ठेऊन आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ट्रॅक्टर आडवे लावून मार्ग बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfloodपूरmonsoonमोसमी पाऊस