शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पूर परिस्थिती जनजागृती व दक्षता हीच महत्त्वाची शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

गोंदिया : आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीचे स्वरूप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पूर्व नियोजन करणे गरजेचे ...

गोंदिया : आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीचे स्वरूप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण व जनजागृती आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करून पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (एसडीआरएफ) पोलीस उपअधीक्षक सुरेश कराळे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारी- २०२१ च्या अनुषंगाने शुक्रवारी आयोजित पूर परिस्थितीत शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी एसडीआरएफ नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे उपस्थित होते. कराळे यांनी, मागील वर्षी २०२० मधील पूर परस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील नियोजन करणे अपेक्षित आहे. आपत्ती काळात परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कामाचे नियोजन करावे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या रंगीत तालीम व प्रशिक्षणाचा वापर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने मान्सून काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. पुराचे प्रकार, पूर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पूर्वसूचना, हवामान खात्याचा अंदाज, आदींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात माहिती देऊन आपले अनुभव सांगितले.

पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

जिल्ह्यातील जलाशय, धरण व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असल्यामुळे येणाऱ्या काळात पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नदीकाठावरील गावांतील नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती कमी असल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. याकरिता विद्यार्थी प्रवर्गाला प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. पूर परिस्थितीत जीवित व वित्त हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

प्रशिक्षणाला यांची उपस्थिती

दीपक परिहार, यादव फरकुंडे, इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिऱ्हेपुंजे, गिरधारीलाल पतैहे, जबराम चिखलोंडे, जितेंद्र गौर, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवी भांडारकर, संदीप कराळे, दिनू दीप, राजकुमार खोटेले, सुरेश पटले, राजेंद्र अंबादे, शर्मानंद शहारे, गजेंद्र पटले, मुकेश ठाकरे, समित बिसेन, राजेंद्र शेंडे, अंश चौरसिया, विशाल फुंडे, राहुल मेश्राम, शहबाज सय्यद, सुमित बिसेन, आदित्य भाजीपाले, अरविंद बिलोन, अजय रहांगडाले, विकास बिजेवार, अंबादे, बांते कावडे, गायधने तसेच एसडीआरएफ व एसआरपीएफचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.