शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण प् ाुलाचे काम बंद; मोबदल्याची मागणी

By admin | Updated: February 28, 2015 00:54 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुल पोचमार्गावरील घरमालकांनी जमिनीचा तथा तुटणाऱ्या घरांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटली आहे.

तुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुल पोचमार्गावरील घरमालकांनी जमिनीचा तथा तुटणाऱ्या घरांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटली आहे. दोन दिवसापासून काम बंद केले आहे. बुधवारी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांनी येथे भेट दिली. काम रखडल्याने संबंधित निधी परत जाण्याची येथे शक्यता निर्माण झाली आहे.रामटेक- तुमसर, तिरोडा-गोंदिया राज्य महामार्ग क्रमांक २४९ वर साखळी क्रमांक १३५/६०० किमी वर तुमसर रोड येथे मुंबई हावडा रेल्वे मार्ग छेदतो. वाहतुकीची कोंडी होत असल्याने उड्डाणपुल बांधण्याकरीता केंद्र व राज्य शासनाने निधी मंजूर केला. केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली. तर संयुक्त प्रकल्प आहे. रेल्वे हद्दीतील काम रेल्वे तर राज्य शासनाच्या हद्दीतील काम सार्वजनिक बांधकाम खाते करीत आहे. या उड्डाणपुलाला जागतिक बँकेने निधी दिली आहे.तुमसर रोड (देव्हाडी) परिसरात रस्त्याच्या बाजूला बायपास रस्ता तयार करणे सुरु आहे. पोचमार्ग तयार करतांनी स्थानिक घरमालकांचा काही भाग तथा भूखंड यात येत असल्याने मोबदल्याची मागणी केली. मोबदला द्या नाही तर कामे करु देणार नाही असा पवित्रा त्यांनी सन २००८ मध्ये उड्डाणपूलाचे काम बीओटी तत्वावर करण्याचा झाला होता. त्यामुळे काहींना मोबदला येथे मिळाला होता. त्यानंतर बिओटीनुसार बांधकाम करणे मागे पडले. जागतिक बँकेने येथे सरसकट निधी दिला. त्यामुळे येथे निधी देण्याकरिता राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून पुढील दिशा ठरणार आहे.जागतिक बँक, बांधकाम उपविभाग नागपूर येथील सहाय्यक अभियंत्यांनी उपअधिक्षक, भूमि अभिलेख, तुमसर यांना रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया रस्त्यावर रेल्वे कॉसींग (मौजा देव्हाडी) च्या दोन्ही बाजूला ५०० मीटर लांबीच्या रस्त्याची मोजणी करण्याचे पत्र दिले. उपअधिक्षकांनी रस्त्याच्या जवळील १० ते १५ भूखंड गटाचे सातबारा सादर करण्याचे येथे निर्देश दिले आहे. तुमसर येथे भूमि उपअधिक्षकांचे नियमित पद आहे. परंतु त्यांच्याकडे इतर दोन तालुक्याचा अतिरिक्त कारभार असल्याने येथे तात्काळ कारवाई होण्यास विलंबाची शक्यता आहे.मार्च अंतीम असल्याने या सर्व प्रक्रियेत निधी परत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांधकाम विभागाने सर्वच विभागांचा ना हरकत येथे घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)