शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात फडकला विदर्भाचा ध्वज

By admin | Updated: May 2, 2016 00:31 IST

वेगळ्या विदर्भाचे आंदोलन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली लढविले जात असुन संपूर्ण विदर्भात त्यांच्या सभेला ....

पोलिसांचा चोख बंदोबस्त : विदर्भवादी संघटनांची उपस्थिती, मुख्य ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्तेभंडारा : वेगळ्या विदर्भाचे आंदोलन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली लढविले जात असुन संपूर्ण विदर्भात त्यांच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भंडाऱ्याच्या सर्व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्थानिक त्रिमूर्ती चौकात करण्यात आला.विदर्भ राज्य आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा घोषित आंदोलनानुसार १ मे रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून माजी आ. आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, महेंद्र निंबार्ते, पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या हस्ते विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करुन स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा दिल्या. भाजपच्या जाहिरनाम्याची होळी करण्यात येईल, अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली होती. परंतु हे आंदोलन सर्वसमावेशक असुन त्याला सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समर्थन असल्यामुळे भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी केली नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा उल्लेख नसल्यामुळे जाहीरनाम्याची होळी करण्याची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने मागे घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी केली होती.शासकीय कार्यक्रम आटोपून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी विदर्भवादी कार्यकर्त्यांना भेटून वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांची जय्यत कुमक होती. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी संपूर्ण खबरदारी घेतली होती. कार्यक्रमाला आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, माजी आमदार मधुकर कुकडे, माजी आमदार आनंदराव वंजारी, नगरसेवक महेंद्र निंबार्ते, संजय सतदेवे, सच्चिदानंद फुलेकर, गणेश धांडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पद्माकर टेंभुर्णीकर, अर्जुन सूर्यवंशी, दामोधर क्षीरसागर, विजय दुबे, अविनाश पनके, रमाकांत पशिने, तुषार हट्टेवार, भीमराव टेंभर्णे, तुळशीराम गेडाम, धनंजय सपकाळ, विलास सुदामे, नितीन तुमाने, चंद्रशेखर टेंभुर्णे, आरती रंगारी, असित बागडे, राजू निर्वाण, अशफाक पटेल, आशिष कुकडे, लक्ष्मीकांत मडामे, अशोक फुले, हनुमंत पेठे, मोनू गोस्वामी, यादव बावनकर, शामराव कळंबे, पी.के. ठवरे, उपेंद्र कावळे उपस्थित होते. संचालन केशव हुड यांनी तर आभार रमाकांत पशिने यांनी मानले. (प्रतिनिधी)शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी - पालकमंत्रीभंडारा: शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना असो की दुष्काळग्रस्त गावांमध्ये देण्यात येणाऱ्या सवलती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनानिमित्त पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन जनतेला संबोधित केले. यावेळी पोलीस पथक, गृहरक्षक दल, बँड पथक, पोलीस दामिनी पथक यांनी पथसंचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय आणि कृषी विभागांनी तयार केलेले चित्ररथ ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, राज्यात एकूण १५ हजार ७४७ दुष्काळग्रस्त गावे जाहिर झाली असून आपल्या जिल्हयातही ३७१ गावांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. यासर्व गावांना शासनाने ७ प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत. मामा तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला असून यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये या कामाकरीता १५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हयाला यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून जिल्हयातील १४६२ तलावांपैकी २७८ तलांवाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी भंडारा आणि तुमसर नगर परिषदेने हागणदारीमुक्त शहर केल्याबाबत नगराध्यक्ष बाबुराव बागडे व अभिषेक कारेमोरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे अंतर्गत रामेश्वर इनवाते, उत्तम वरकडे, सुखदेव कोडवते या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यरंभ आदेश देण्यात आला. संचलन स्मिता गालफाडे आणि मुकुंद ठवकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)