शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2015 00:40 IST

महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

भंडारा : महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी ध्वजारोहण करून जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश पडोळे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस श्वान पथक आणि पोलीस बॅन्ड पथक यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस नाईक विजय वंजारी व ललीत टिकरिया यांनी उत्तम अभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या शिवनी मोगरा व रेंगेपार कोहळी या ग्रामपंचायतींना पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत अल्प कालावधीत पवनी नगर परिषद मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची उत्कृष्ट वसुली केल्याबाबत पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देवळीकर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबाबत लघुलेखक ज्ञानेश्वर तिनखेडे, मंडळ अधिकारी सुरेश खडकसिंगे, शिपाई किशोर वाडीभस्मे, कारधा पोलीस पाटील भाऊराव मडामे, अव्वल कारकुन संजय जांभुळकर, लिपीक टंकलेखक माधुरी मस्के, तलाठी पी. व्ही. अहिर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.शहरात ८० घरफोडीच्या गुन्ह्यात ८८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ लक्ष ६२ हजार रूपयांची मालमत्ता हस्तगत करणाऱ्या गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, सहायक पोलीस निरीक्षक जयंत गादेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गिते, पोलीस नाईक तुलशिराम मोहरकर, प्रशांत गुरव, बबीता चौरे आणि स्रेहल गजभिये यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान उत्कृष्ट व्हिडीओग्राफी करून मोलाची कामगिरी बजावणारे पोलीस शिपाई घनशाम कोडापे तसेच सुनिल सोनवाने व अरुण केसलकर या पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व विभाग प्रमुख, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)