शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देनिवेदनाला केराची टोपली : विद्यार्थी, शेतकऱ्यांना सुमार फटका, पाथरी-पालांदूर मार्गावरील बांधकाम

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ये जा करावी लागते. मात्र ये जा करण्याकरिता या मार्गावरील चुलबंदला जोडणारा मोठा नाला आड येत असल्याने वर्षभर असह्य त्रास सहन करीत प्रवास करावा लागतो.पाच वर्षापूर्वी याच नाल्यावर पुलिया बांधण्यात आला होता. पण पूर्णत्वास जाऊ शकला नसल्याने आजही तो पुल अर्धवटच पडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाने राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा गावात पाहली नाही. १२ वर्षांपासून गावात प्रादेशिक नळ योजना खितपत पडली असून उपयोगात नव्हती. मागील महिन्यात ती पूर्ववत होत गावाला नळाचे पाणी घरपोच मिळाले. गावाला रुंद व स्वच्छ रस्ते नाही. गावाला खातकुडा नाही आदी विविध समस्यांनी पाथरी नाला खीतपत आहे.चुलबंद व नाल्याच्या किनाऱ्यावर गाव असल्याने भूजल बºयापैकी आहे. याच आरोग्यावर वार्षीक शेती हाच मुख्य व्यवसाय पाथरीवासीयांचा अधोरेखीत आहे. शेतीमुळे मुख्य बाजारपेठ पालांदूर आहे. मुलांना प्राथमिकस्तराच्या शिक्षणाकरिता पालांदुरचा आधार आहे. भर पावसात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना नाल्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. अन्यथा पाच कि.मी. चा फेरा घालत मऱ्हेगाव मार्गे किंवा खराशी लोहारा मार्गे पालांदूर गाठावे लागते. ही पाथरीवासीयांची व्यथा दूर करणारा देवदूत मिळेल का? प्रगत अत्याधुनिक काळात सुखसोयी गाववासीयांना मिळतील का? असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने व लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पाथरीवासी विकासाच्या कोसो दूर आहेत. अर्धवट बांधून उभ्या असलेला पुल पुन्हा नव्याने बांधावा याकरिता निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे.पाथरीवासीयांना नाल्यावरील अत्यंत महत्वाचा पुल आहे. पुलाच्या बांधकामाबाबत वारंवार प्रशासन, लोकप्रतिनिधींना सांगूनही फायदा झालेला नाही. गाव् ाविकासाकरिता शासकीय निधी अपेक्षित येत नसल्याने समस्या कायम आहेत.-तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी.गाव विकासाकरिता वरिष्ठ नेते, पुढारी सहकार्य करीत नसल्याने विकासच नाही. आमदार, खासदारांना जागवल्याशिवाय मोठी निधी गावाला मिळू शकत नाही. केवळ निवडणुकांपूरतेच गावाला भेट देतात. आश्वासनांची खैरात वाटून पुन्हा पाच वर्ष विसरून जातात.-श्रावण सपाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता, पाथरी.पालांदूर -पाथरी पुलामुळे दोन्ही गावाच्या शेतकºयांना शेती कसायला मोठी मदत होईल. पुलाच्या बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींना वेठीस धरून कामाकरिता सातत्य महत्वाचे आहे. दोन गावांमध्ये नाळ जुळल्याने पालांदूर -पाथरी पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येणे गरजेचे आहे.-पंकज खंडाईत, पालांदूर.